मराठी बातम्या /बातम्या /देश /

दलिया आणि चहा : चिदंबरम यांचा तिहार तुरुंगातला पहिला दिवस

दलिया आणि चहा : चिदंबरम यांचा तिहार तुरुंगातला पहिला दिवस

चिदंबरम यांना बुधवारी जेव्हा तिहारच्या तुरुंगात आणण्यात आलं तेव्हा ते रात्रभर शांतपणे झोपू शकले नाहीत. सकाळी त्यांनी थोडं खाल्लं आणि चहा घेतला. चिदंबरम यांनी झोपण्यासाठी पलंग मागितला होता पण त्यांना तो नाकारण्यात आला.

  • Published by:  Arti Kulkarni

नवी दिल्ली, 6 सप्टेंबर : INX मीडिया प्रकरणी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची रवानगी तिहार तुरुंगात झाली आहे. या तुरुंगात त्यांनी काल लाकडी पलंगावर झोपून रात्र काढली. शुक्रवारी सकाळी मात्र ते तुरुंगाच्या परिसरात थोडे फिरले, काही पुस्तकं वाचली आणि आपली मुलगा कार्ती चिदंबरम याचीही भेट घेतली. गेल्या वर्षी कार्ती चिदंबरम यांनीही याच कोठडीमध्ये 12 दिवस काढले होते.

चिदंबरम यांना बुधवारी जेव्हा तिहारच्या तुरुंगात आणण्यात आलं तेव्हा ते रात्रभर शांतपणे झोपू शकले नाहीत. सकाळी त्यांनी थोडं खाल्लं आणि चहा घेतला. चिदंबरम यांनी झोपण्यासाठी पलंग मागितला पण जेलमधल्या डॉक्टरांच्या तपासणीनंतर गरज पडली तर तो त्यांना दिला जाईल, असं सांगण्यात आलं. त्यांना तिहारमधल्या सात नंबरच्या कोठडीत ठेवण्यात आलं आहे. इथे इडीच्या खटल्यातल्या आरोपींनाच ठेवण्यात येतं.

16 सप्टेंबरला वाढदिवस

चिदंबरम यांचा 16 सप्टेंबरला वाढदिवस आहे. ते त्यादिवशी 74 वर्षांचे होतील. जर जामीन मिळाला नाही तर त्यांना वाढदिवसालाही तुरुंगातच राहावं लागेल. चिदंबरम यांना सध्यातरी कोणतीही विशेष सुविधा दिलेली नाही. अन्य कैद्यांप्रमाणेच ते तुरुंगातल्या वाचनालयात जाऊ शकतात आणि काही ठराविक वेळ टीव्ही पाहू शकतात. चिदंबरम यांना कोर्टाने त्यांचा चष्मा आणि औषधं सोबत घेऊन जायला परवानगी दिली होती.

काय आहे INX मीडिया खटला ?

इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी यांनी 2007 मध्ये INX मीडिया या नावाने कंपनी बनवली. परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देणाऱ्या FIPB ने INX मीडिया ला 4 कोटी 62 लाख रुपयांच्या परकीय गुंतणुकीची मर्यादा दिली होती. पण INX मीडिया ने हे नियम धाब्यावर बसवून 305 कोटी 36 लाख रुपये परकीय गुंतवणूक मिळवली. या रकमेतून INX मीडिया कंपनीने बेकायदेशीररित्या 26 टक्के रक्कम न्यूज चॅनलमध्ये गुंतवली. त्यासाठी त्यांनी FIPB ची परवानगीही घेतली नव्हती. CBI च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, INX मीडिया कंपनीसाठी मॉरिशसमधल्या 3 कंपन्यांकडून बेकायदेशीररित्या पैसे येत होते, असं अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक गुप्तचर शाखेने म्हटलं आहे.

चांद्रयान - 2 चं लँडिंग पाहतानाचा तुमचा फोटो पंतप्रधान करणार शेअर!

2007 मध्ये पी. चिदंबरम अर्थमंत्री असताना या बेकायदेशीर परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली, असा आरोप होता. 15 मे 2017 ला CBI ने FIPB मध्ये झालेल्या अनियमततेबद्दल तक्रारही दाखल केली होती.याच वेळी या खटल्यात पहिल्यांदा पी. चिदंबरम यांचं नाव आलं.

============================================================================================================

VIDEO : असं उतरणार चांद्रयान-2 चंद्रावर, त्यानंतर 'हे' असेल मोठं आव्हान

First published:

Tags: Chidambaram, Tihar jail