पी. चिदंबरम आणि इंद्राणी मुखर्जी येणार आमनेसामने, नार्को टेस्टचीही शक्यता

CBI आणि ED हे चिदंबरम यांच्या उत्तरामुळे समाधानी नाहीत. त्यामुळे आता CBI इंद्राणी मुखर्जी आणि पी. चिदंबरम यांना समोरासमोर आणून चौकशी करणार आहे. INX मीडियाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी चिदंबरम यांची लाय डिटेक्टर टेस्ट होण्याचीही शक्यता आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 27, 2019 05:01 PM IST

पी. चिदंबरम आणि इंद्राणी मुखर्जी येणार आमनेसामने, नार्को टेस्टचीही शक्यता

नवी दिल्ली, 26 ऑगस्ट : माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना ईडीच्या अटकेपासून एक दिवस दिलासा मिळाला आहे. चिदंबरम यांच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. CBI आणि ED हे चिदंबरम यांच्या उत्तरामुळे समाधानी नाहीत. त्यामुळे आता CBI इंद्राणी मुखर्जी आणि पी. चिदंबरम यांना समोरासमोर आणून चौकशी करणार आहे. INX मीडियाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी चिदंबरम यांची लाय डिटेक्टर टेस्ट होण्याचीही शक्यता आहे.

चिदंबरम यांची कोर्टात बाजू मांडणारे वकील कपिल सिब्बल यांनी मात्र यावरून CBI वर ताशेरे ओढले आहेत. CBI ला चिदंबरम यांच्या तोंडून काही गोष्टी वदवून घ्यायच्या आहेत. CBI कुठूनही काही कॉपी करून बोलतेय, असा आरोप त्यांनी केला. कपिल सिब्बल यांनी EDच्या तपासावरही सवाल उपस्थित केले आहेत.

चिदंबरम यांचे दुसरे वकील अभिषेक मुन सिंघवी यांच्या म्हणाले, जर ED चौकशीमध्ये काही प्रश्न विचारते आहे तर आरोपीने दिलेली उत्तरं कोर्टातही सांगितली पाहिजे. याआधी, चिदंबरम यांनी सुप्रीम कोर्टाने दणका देत त्यांचा अंतरिम जामिनासाठीची याचिका फेटाळून लावली होती. चिदंबरम 30 ऑगस्टपर्यंत CBI च्या कोठडीत राहणार आहेत.

काय आहे INX मीडिया खटला ?

इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी यांनी 2007 मध्ये INX मीडिया या नावाने कंपनी बनवली. परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देणाऱ्या FIPB ने INX मीडिया ला 4 कोटी 62 लाख रुपयांच्या परकीय गुंवणुकीची मर्यादा दिली होती. पण INX मीडिया ने हे नियम धाब्यावर बसवून 305 कोटी 36 लाख रुपये परकीय गुंतवणूक मिळवली. या रकमेतून INX मीडिया कंपनीने बेकायदेशीररित्या 26 टक्के रक्कम न्यूज चॅनलमध्ये गुंतवली. त्यासाठी त्यांनी FIPB ची परवानगीही घेतली नव्हती. CBI च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, INX मीडिया कंपनीसाठी मॉरिशसमधल्या 3 कंपन्यांकडून बेकायदेशीररित्या पैसे येत होते, असं अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक गुप्तचर शाखेने म्हटलं आहे.

Loading...

विंग कमांडर अभिनंदन मिग विमानातून पुन्हा घेणार भरारी

चिदंबरम यांचं नाव खटल्यात आलं कसं ?

2007 मध्ये पी. चिदंबरम अर्थमंत्री असताना या बेकायदेशीर परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली, असा आरोप होता. 15 मे 2017 ला CBI ने FIPB मध्ये झालेल्या अनियमततेबद्दल तक्रारही दाखल केली होती.याच वेळी या खटल्यात पहिल्यांदा पी. चिदंबरम यांचं नाव आलं.

पी. चिदंबरम यांच्याविरोधात तपास सुरूच राहिला. वेळोवेळी छापेही घातले गेले पण ठोस पुरावा मिळत नव्हता. कायदे मंत्रालयाने 3 फेब्रुवारी 2018 ला चिदंबरम यांचा तपास करण्याचे आदेश दिले. ईडी म्हणजेच सक्तवसुली संचालनालयाने कार्ती चिदंबरम यांच्या तपासाचे आदेश दिले. त्यांच्यावर छापे घातले आणि 54 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, FIPB कडून परकीय गुंतवणुकीला परवानगी मिळवण्याबद्दल INX मीडिया चे संचालक इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी यांनी एका वरिष्ठ नेत्याची भेट घेतली. इंद्राणी मुखर्जीने हे वरिष्ठ नेता पी. चिदंबरम आहेत, असं CBI ला सांगितलं.

DDCAचा मोठा निर्णय, फिरोज शाह कोटला मैदानाचे नाव बदलणार!

इंद्राणीच्या जबाबानंतर चिदंबरम यांना अटक

इंद्राणीने तिच्या जबाबात म्हटलं होतं, पीटर मुखर्जी यांनी चिदंबमरम यांच्याशी चर्चा सुरू केली आणि INX मीडिया चा परकीय गुंतवणुकीचा अर्ज चिदंबरम यांच्याकडे सोपवला. या परवानगीच्या बदल्यात पीटर मुखर्जी यांनी कार्ती चिदंबरम यांना मदत करावी, असं चिदंबरम यांनी सांगितलं. इंद्राणी मुखर्जीचा हा जबाब ईडी ने आरोपपत्रात लिहिला आहे आणि कोर्टासमोरही तो पुरावा म्हणून सादर करण्यात आला. कार्ती चिदंबरम यांची संपत्ती INX मीडिया प्रकरणी मिळालेल्या लाचेच्या रकमेतून खरेदी करण्यात आली, असा आरोप आहे.

====================================================================================================================

VIDEO:11 हजार व्होल्ट तीव्र विजेच्या तारेला अडकलं चार्टर्ड विमान, त्यांनतर काय झालं तुम्हीच पाहा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 27, 2019 05:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...