मराठी बातम्या /बातम्या /देश /

OYO हॉटेलमध्ये भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू

OYO हॉटेलमध्ये भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू

या दुर्दैवी घटनेत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. (फोटो-आजतक)

या दुर्दैवी घटनेत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. (फोटो-आजतक)

Fire in OYO Hotel: एका OYO हॉटेलमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

  • Published by:  News18 Desk

दिल्ली, 15 ऑगस्ट: रविवारी सकाळी दिल्लीतील द्वारका परिसरातील एका OYO हॉटेलमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही आग द्वारका परिसरातील सेक्टर 8 मधील OYO हॉटेल कृष्णा मध्ये लागली होती. सकाळी 7.25 च्या सुमारास आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. आता अग्निशमन विभागानं आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवलं आहे.

मृत झालेल्यांमध्ये एक महिलेसह एका पुरुषाचा समावेश आहे. दोघांचेही मृतदेह तळमजल्यावरील पायऱ्यांजवळ भाजलेल्या अवस्थेत सापडले आहेत. दोन्ही मृतदेह आगीतून बाहेर काढल्यानंतर त्यांना त्वरित  डीडीयू रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.

हेही वाचा-जालन्यात पुजाऱ्यानं दत्तक घेतलेल्या मुलीवर सामूहिक बलात्कार, VIDEO ही केला शूट

आतापर्यंत हॉटेलच्या आतून 2 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर अन्य 2 ते 3 लोकं जखमी झाले आहेत. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पोलीस आगीच्या नेमक्या कारणाचा शोध घेत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना आज सकाळी साडेसातच्या सुमारास फोन आला होता  की, मदर डेअरीजवळ एका OYO हॉटेलमध्ये आग लागली आहे. तसेच त्यामध्ये अनेक लोकं अडकले असल्याचं समोरून सांगण्यात आलं होतं. यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्याही त्याठिकाणी तातडीनं पोहोचल्या.

हेही वाचा-पालिका कर्मचाऱ्याने आपल्याच हाताने स्वत:च्या गळ्यावर फिरवला सुरा

संबंधित आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेलं हॉटेल ज्या इमारतीत होतं, त्या इमारतीच्या मालकाचं नाव सिद्धार्थ आणि करुणा अशी आहेत. ते मुळचे झारखंडचे रहिवासी असून सध्या लोकेश नावाच्या व्यक्तीकडे या हॉटेलचं मॅनेजमेंट होतं. याबाबत माहिती देताना लोकेशनं सांगितलं की, काल रात्री हॉटेलमध्ये एकेठिकाणी शॉर्टसर्किट झालं होतं, त्यानंतर लाईटही गेली होती. पण सकाळी 7 च्या सुमारास हॉटेलमधून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट निघत होते. तळमजल्यावर शॉर्टसर्कीटमुळे आग लागली असावी, असंही लोकेशनं सांगितलं आहे.

First published:

Tags: Delhi, Fire