नवी दिल्ली, 14 मे : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी 'Modilie' या शब्दाचा वापर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल चढवला. इंग्रजी शब्दकोशामध्ये 'Modilie' शब्द असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं. त्यानंतर ऑफ्सफर्ड डिक्शनरीनं 'Modilie' असा कोणताही शब्द नसल्याचं सांगत राहुल गांधींचे आरोप फेटाळून लावले. महत्त्वाची बाब म्हणजे ऑक्सफर्ड डिक्शनरीनं आपल्या ऑफिशअल ट्विटर हॅन्डलवरून हे उत्तर दिलं आहे.
There’s a new word in the English Dictionary. Attached is a snapshot of the entry :) pic.twitter.com/xdBdEUL48r
आमच्या शब्दकोशात 'Modilie' नाही. आम्ही त्याचं खंडन करतो. ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या कोणत्याही डिक्शनरीमध्ये हा शब्द नाही असं ऑक्सफर्ड डिक्शनरीनं म्हटलं आहे.
‘Modilie’ is a new word that’s become popular worldwide. Now there’s even a website that catalogues the best Modilies! https://t.co/Ct04DlRsj3
'Modilie' शब्द ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. पण, आता ऑफ्सफर्डनं दिलेल्या उत्तरावरून भाजपनं राहुल गांधी यांना प्रत्युत्तर मिळालं असं म्हटलं आहे.
— Chowkidar Amit Malviya (@amitmalviya) May 16, 2019
यापूर्वी देखील राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. नरेंजद्र मोदी खोटं बोलत असल्याचा आरोप केला होता. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत दोन्ही नेत्यांनी परस्परांवर जोरदार आरोप केले होते. संधी मिळेल त्या ठिकाणी दोन्ही नेत्यांनी आरोप - प्रत्यारोप केले होते. त्यामुळे देशाच्या राजकीय वातावरणात गर्मी जाणवत होती.
बिबट्याच्या शिकारीचा डाव फसला; सांबरानंच दाखवला इंगा, पाहा LIVE व्हिडिओ