Home /News /national /

गुजरात राजकारणात ओवैसींची मोठी खेळी; काँग्रेसची झोप उडाली, पण भाजपचं काय?

गुजरात राजकारणात ओवैसींची मोठी खेळी; काँग्रेसची झोप उडाली, पण भाजपचं काय?

गुजरातच्या राजकारणातील एमआयएमचे प्रमुख (AIMIM) ओवैसी यांच्या खेळीमुळे कॉंग्रेसची झोप उडाली आहे.

    अहमदाबाद, 1 जानेवारी : गुजरातच्या राजकारणातील (Gujrat Politics) एआयएमआयएमचे प्रमुख (AIMIM) ओवैसी यांच्या खेळीमुळे कॉंग्रेसची झोप उडाली आहे. भारतीय आदिवासी पक्षाशी युती झाल्याने या पक्षांनी राज्यातील मुस्लीम व आदिवासी वोट बँकेवर आपला दावा ठोकला आहे. आदिवासी आणि मुस्लीम वोट बँकांना गुजरातमधील कॉंग्रेसची पारंपारिक वोट बँक मानली जाते. त्या जोरावर माजी मुख्यमंत्री माधवसिंग सोलंकी यांनी आपल्या काळात गुजरातमधील सर्वाधिक 144 जागा जिंकून सरकार स्थापन केले होते. माधवसिंह सोलंकी यांच्या KHAM सिद्धांताची अजूनही गुजरातमध्ये चर्चा आहे. या पक्षांसोबत ओवैसीने केली युती भारतीय आदिवासी पार्टी बीटीपी आणि AIMIM ने गुजरातमध्ये येत्या निवडणुकीसाठी विचारपूर्वक युती केली आहे. बीटीपीचे अध्यक्ष छोटू भाई वसावा यांनी ट्विट करीत स्वत: या युतीची घोषणा केली. यानंतर प्रदेशातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. काँग्रेस नेता सरळपणे याला काँग्रेस वोट बँकमध्ये आडकाठी लावण्यासाठी एक रणनीती असल्याचं सांगत आहेत. आदिवासीबहुल भागात भाजपाचा फायदा गेल्या काही विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुकांमध्ये आदिवासीबहुल भागात भाजपाला आधीच प्रचंड बहुमत मिळत आहे. असे असूनही, कॉंग्रेसची आदिवासी वोट बँक हा मुस्लीम वोट बँकेसोबत एकत्रितपणे कॉंग्रेसची सरळ विजयी फॉर्म्युला तयार होत आहे. सरळ शब्दांत सांगायचे झाले तर राज्यातली ही नवी युती कॉंग्रेसच्या राजकीय समीकरणात अडथळा आणेल. आतापर्यंत अधिकृतपणे काँग्रेसचा कोणत्याही नेत्याने याबाबत वक्तव्य केलेलं नाही. मात्र गुजरातमध्ये या नवा युतीचा स्वीकार केला तर यानंतर निवडणुकीत देशातील अन्य राज्यांमध्ये या युतीची सुरुवात होण्यास नाकारता येणार नाही.  युतीच्या घोषणेनंतर शुक्रवारी पहिल्यांदा दोन्ही पक्षांच्या प्रदेश स्तरावरुन नेत्यांची बैठक करीत पुढील रणनीतीबाबत चर्चा करीत आहेत. ही नवीन युती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरू शकते. स्थानिक निवडणुका फेब्रुवारी 2020 मध्ये होणार असून भारतीय जनता पक्षाने स्थानिक पातळीवर जोरदार तयारी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेसने तयारी केली आहे पण नवीन युतीची घोषणा झाल्यानंतर त्याच्या रणनीतीत बदल होण्याची शक्यता आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Gujrat, MIM, ओवेसी MIM

    पुढील बातम्या