शाहीनबागेला ‘जालीयनवाला बाग’ करण्याचा डाव, वाचा कुणी केला मोदी सरकारवर गंभीर आरोप

शाहीनबागेला ‘जालीयनवाला बाग’ करण्याचा डाव, वाचा कुणी केला मोदी सरकारवर गंभीर आरोप

सरकारला शाहीनबागमधलं आंदोलन दडपून टाकायचं आहे. त्यामुळे होवू शकतं की ते आंदोलकांना गोळ्या घालतील असा गंभीर आरोप मोदी सरकारवर करण्यात आलाय.

  • Share this:

हैदराबाद, 06 फेब्रुवारी: गेल्या दीड महिन्यापासून दिल्लीतील शाहीन बागमध्ये सुरु असलेल्या आंदोकांवर सरकारकडून बळाचा वापर केला जावू शकतो, असा आरोप MIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसींनी केला आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (CAA) विरोधात दिल्लीतील शाहीन बाग परिसरात गेल्या 50 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे.

'सरकारला शाहीनबागमधलं आंदोलन दडपून टाकायचं आहे. त्यामुळे होऊ शकतं की ते आंदोलकांना गोळ्या घालतील. शाहीनबागेला जालीयनवाला बागही बनवलं जावू शकतं, हे होऊ शकतं', असा गंभीर आरोप असदुद्दीनं ओवेसींनी केला आहे. दिल्लीतल्या विधानसभा निवडणुकीच्यानंतर शाहीन बागच्या आंदोलनकांना हटवलं जावू शकतं अशी वक्तव्य भाजपच्या नेत्यांकडून आली होती. त्या पार्श्वभूमीवर ओवेसींनी हे वक्तव्य केलंय.

NRC आणि NPR च्या प्रश्नांवर ओवेसींनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतलीय. सरकारनं स्पष्ट शब्दात सांगायला हवं की 2024 पर्यंत देशात एनआरसी लागू होणार नाही. एनपीआरवर 3900 कोटी रुपये का खर्च केले जात आहेत? हिटलरनेही त्याच्या सत्ताकाळात दोन वेळा जनगणना केली होती. त्यानंतर अनेक यहुदींना ठार केलं होतं. आपल्या देशात असं काही घडावं असं मला वाटत नाही. मी इतिहासाचा विद्यार्थी असल्यानं असा विचार करतो हे सांगायला ओवेसी विसरले नाहीत.

हे वाचा - राम मंदिराच्या प्रश्नावरून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल, केला हा आरोप

शाहीन बाग आणि जामिया परिसरात तीनवेळा गोळीबाराच्या घटना घडल्या. तर दुसरीकडे दिल्ली पोलिसचे डीसीपी राजेश देव यांच्याविरोधात निवडणूक आयोगानं अत्यंत कठोर भूमिका घेतलीय. डीसीपींचं वक्तव्य हे पूर्णपणे अयोग्य होतं अशा शब्दात निवडणूक आयोगानं त्यांना फटकारलं. शिवाय त्यांना निवडणूक प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आलं आहे. कारण देव यांनी शाहीन बागमध्ये गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचा संबंध आम आदमी पक्षाशी असल्याची तपासातली माहिती माध्यमांना दिली होती. त्यानंतर आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी अधिकाऱ्याविरोधात कारवाई करावी यासाठी निवडणूक आयोगाचं दार ठोठावलं होतं. त्यानंतर निवडणूक आयोगानं त्याची गंभीर दखल घेत कारवाईचे आदेश दिलेत.

हे वाचा - दिल्लीत भाजप किती जागा जिंकणार? प्रचार संपताना अमित शहांनी सांगितला आकडा

First published: February 6, 2020, 7:41 PM IST

ताज्या बातम्या