उत्तर प्रदेशमधल्या या लोकसभा जागेतून लढू शकतात ओवेसी, MIM च्या बैठकीत फैसला

असादुद्दीन ओवेसी यांनी हैदराबादसोबतच उत्तर प्रदेशमधून कोणत्यातरी एका जागेवरून लढावं, असा हा प्रस्ताव होता. त्यानुसार असादुद्दीन ओवेसी यांनी उत्तर प्रदेशमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 9, 2019 03:32 PM IST

उत्तर प्रदेशमधल्या या लोकसभा जागेतून लढू शकतात ओवेसी,  MIM च्या बैठकीत फैसला

नवी दिल्ली, 9 मार्च : एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असादुद्दीन ओवेसी उत्तर प्रदेशमधल्या एका जागेवरून निवडणूक लढू शकतात, असं एमआयएमचे उत्तर प्रदेशचे अध्यक्ष शौकत अली यांनी जाहीर केलं आहे.

अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष, मायावती यांचा बहुजन समाज पक्ष आणि राष्ट्रीय लोकदल यांच्या आघाडीमुळे उत्तर प्रदेशची निवडणूक रंगतदार बनली आहे.

त्यातच आता ऑल इंडिया मजलिस – ए – इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच एमआयएम च्या या घोषणेमुळे सगळ्याचं लक्ष उत्तर प्रदेशच्या राजकारणाकडे वळल आहे.

असादुद्दीन ओवेसींच्या एमआयएम पक्षाची 2 मार्चला राष्ट्रीय स्तरावरची बैठक झाली. या बैठकीत उत्तर प्रदेश एमआयएम पक्षाकडून हा प्रस्ताव ठेवण्यात आला, असं शौकत अली यांनी News 18 ला सांगितलं.

असादुद्दीन ओवेसी यांनी हैदराबादसोबतच उत्तर प्रदेशमधून कोणत्यातरी एका जागेवरून लढावं, असा हा प्रस्ताव होता. त्यानुसार असादुद्दीन ओवेसी यांनी उत्तर प्रदेशमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading...


पाकिस्तान स्वतःच सांगतोय 'मोदी ने मारा'; पण विरोधक मागताहेत पुरावे'


ओवेसी हे अलिगढ मतदारसंघातून निवडणूक लढवणार, अशी चर्चा आहे पण एमआयएमकडून याबदद्ल अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यांच्या उमेदवारीमुळे कार्यकर्त्यांमध्ये मात्र उत्साह संचारला आहे.

ओवेसी यांच्या पक्षाचा हैदराबादमध्ये चांगलाच दबदबा आहे. ते याआधी हैदराबादमधून खासदार म्हणून म्हणून निवडून आले आहेत. आता उत्तर प्रदेशमध्ये त्यांच्या उमेदवारीला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहावं लागेल.

दरम्यान, अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या मध्यस्थांमध्ये श्री श्री रविशंकर यांच्या नावाला ओवेसी यांनी विरोध केला आहे.या वादावर तोडगा काढण्यासाठी तटस्थ मध्यस्थ नेमावे, असं त्यांनी म्हटलं आहे.

मुस्लीमधर्मियांनी अयोध्येवरचा दावा सोडता कामा नये, असंही वक्तव्य त्यांनी केलं आहे.


=============================================================================

पाकिस्तान स्वतःच सांगतोय 'मोदी ने मारा'; पण विरोधक मागताहेत पुरावे'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 9, 2019 03:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...