S M L

काॅर्टून चॅनल्सवर जंकफूड-कोकाकोलाच्या जाहिरातींना बंदी

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने कोका कोला, नेस्लेसह अन्य 9 कंपन्यांना निर्देश दिले असून यात काॅर्टून वाहिन्यांवर जाहिरात दाखवू नये असं स्पष्ट सांगण्यात आलंय.

Sachin Salve | Updated On: Feb 8, 2018 06:55 PM IST

काॅर्टून चॅनल्सवर जंकफूड-कोकाकोलाच्या जाहिरातींना बंदी

08 फेब्रुवारी : केंद्र सरकारने लहान मुलांवर लक्ष केंद्रीत करत कार्टुन चॅनलवर जंकफूड आणि कोका-कोलाच्या जाहिरातींवर बंदी घातल्याचा निर्णय घेतलाय.

लहान मुलांच्या आरोग्यात होत असलेल्या बदलामुळे केंद्र सरकारने जंक फूड आणि या सारख्या पदार्थांना थांबवण्यासाठी पाऊल उचलले. सरकारच्या या निर्णयाचं स्वागत होतंय. केंद्र सरकारने कार्टून चॅनलवर या जाहिरातींवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. मात्र, याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने कोका कोला, नेस्लेसह अन्य 9 कंपन्यांना निर्देश दिले असून यात काॅर्टून वाहिन्यांवर जाहिरात दाखवू नये असं स्पष्ट सांगण्यात आलंय.

अशा जाहिराती पाहिल्यामुळे लहान मुलांना जंक फूड खाण्याची सवय लागतेय. टीव्ही पाहत असताना मुलं जंक फूड जास्त प्रमाणावर खातात. जे आरोग्यासाठी धोकादायक आहे अशी प्रतिक्रिया राजवर्धन सिंह राठोड यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 8, 2018 06:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close