मराठी बातम्या /बातम्या /देश /भरधाव ट्रकची मिठाईच्या दुकानाला टक्कर; अपघातात 16 जणांना चिरडलं, तर 6 जणांचा जागीच मृत्यू

भरधाव ट्रकची मिठाईच्या दुकानाला टक्कर; अपघातात 16 जणांना चिरडलं, तर 6 जणांचा जागीच मृत्यू

Road Accident: एका मिठाईच्या दुकानात भरधाव ट्रक शिरल्याने मोठा अपघात घडला (over speed truck hits sweet shop) आहे. या अपघातात ट्रकने एकूण 16 जणांना चिरडलं आहे, तर 6 जणांचा जागीच मृत्यू (6 Deaths) झाला आहे.

Road Accident: एका मिठाईच्या दुकानात भरधाव ट्रक शिरल्याने मोठा अपघात घडला (over speed truck hits sweet shop) आहे. या अपघातात ट्रकने एकूण 16 जणांना चिरडलं आहे, तर 6 जणांचा जागीच मृत्यू (6 Deaths) झाला आहे.

Road Accident: एका मिठाईच्या दुकानात भरधाव ट्रक शिरल्याने मोठा अपघात घडला (over speed truck hits sweet shop) आहे. या अपघातात ट्रकने एकूण 16 जणांना चिरडलं आहे, तर 6 जणांचा जागीच मृत्यू (6 Deaths) झाला आहे.

नालंदा, 29 मार्च: सर्व देश उत्सहात होळी साजरी करत असताना होळीच्या रंगात भंग करणारी घटना समोर आली आहे. एका मिठाईच्या दुकानात भरधाव ट्रक शिरल्याने मोठा अपघात घडला (over speed truck hits sweet shop) आहे. या अपघातात ट्रकने एकूण 16 जणांना चिरडलं आहे, तर 6 जणांचा जागीच मृत्यू (6 Deaths) झाला आहे. ट्रकचालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला आहे. या घटनेनंतर परिसरात तणाव वाढला होता. तर गावातील संतप्त नागरिकांनी पोलीस स्थानकाला घेराव घालून बराच काळ गोंधळ घातला आहे. दरम्यान संतप्त नागरिकांनी पोलीस स्टेशन परिसरातील सरकारी मालमत्ता आगीच्या हवाली (Government property set on fire) केली आहे, तर जखमी लोकांना घेवून जाणाऱ्या रुग्णवाहिकेवर देखील दगडफेक (Stone pelting)करण्यात आली आहे.

या अपघातातनंतर काही लोकं पोलिसांच्या मदतीने जखमींना सुरक्षित बाहेर काढत होते. तर काहीजण त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचं काम करत होते. दरम्यान हजारोंच्या संख्येत जमलेल्या संतप्त लोकांनी पोलीस स्थानकावरच हल्ला चढवला आहे. त्यांनी सर्वप्रथम सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर हल्ला केला. त्यानंतर पोलीस स्थानकावर तुफान दगडफेक केली. त्याचबरोबर काही लोकांनी एका पोलिसाची सर्विस रिव्हॉल्वरही हिसकावून घेतली होती. पण कालांतराने काही गावकऱ्यांनी समजावून सांगितल्यानंतर ही बंदुक परत करण्यात आली आहे. संबंधित घटना बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील तेल्हाडा पोलीस स्थानकाच्या हद्दीतील ताडपर या गावातील आहे.

मृताची ओळख पटली

या अपघातानंतर मृतांची ओळख पटली आहे. या अपघातात धीरेंद्र कुमार (वय 12), कौशल किशोर, प्रदुमन कुमार (वय - 16) पल्लू प्रसाद (वय- 84) , सुरनहुज जमादार (वय- 60) सोबत अन्य एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा- मशिदीचा खांब कोसळून 2 चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; एकाची प्रकृती गंभीर

पोलीस स्थानकावर दगडफेक

या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनवर दगडफेक केली आहे. ज्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनाही पोलीस स्टेशनमध्ये बंद करून घ्यावं लागलं आहे. दरम्यान, संतप्त जमावाने इस्लामपूर पोलीस स्टेशनचा एक वाहन,अग्निशमन दलाचे एक वाहन, पोलीस स्टेशनचा जनरेटर, तीन दुचाकी, एक जप्त केलेला ऑटोसहीत 8 वाहनांना आगीच्या हवाली केलं आहे. यानंतर अनेक वरिष्ट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून संतापलेल्या जमावाला शांत केलं आहे. तब्बल चार तास परिसरात तणावाचं वातावरण होतं. पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत.

First published:

Tags: Bihar, Death, Road accident