ओमर अब्दुल्लांच्या 'त्या' मागणीचा गौतमनं घेतला 'गंभीर' समाचार

ओमर अब्दुल्लांच्या 'त्या' मागणीचा गौतमनं घेतला 'गंभीर' समाचार

जम्मू काश्मीरसाठी स्वतंत्र पंतप्रधानांची मागणी करणाऱ्या ओमर अब्दुल्लांच्या विधानाचा टीम इंडियाचा माजी क्रिकेटर गौतम गंभीरनं चांगलाचा समाचार घेतला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 2 एप्रिल : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुला यांनी जम्मू-काश्मीरसाठी स्वतंत्र पंतप्रधानांच्या केलेल्या मागणीवरून आता देशाचं राजकीय वातावरण तापू लागलं आहे. ओमर अब्दुल्लांच्या या मागणीचा टीम इंडियाचा माजी क्रिकेटर गौतम गंभीरनं चांगलाचा समाचार घेतला आहे. गौतम गंभीरनं अब्दुल्लांवर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.

गौतम गंभीरनं ट्विट करत म्हटलं की, 'ओमर अब्दुल्लांना जम्मू-कश्मीरसाठी स्वतंत्र पंतप्रधान हवा आहे आणि मला समुद्रावर चालायचं आहे. ओमर अब्दुल्लांना पंतप्रधान हवा आहे आणि मला डुक्कराला हवेत उडताना पाहायची इच्छा आहे. ओमर अब्दुल्लांनी स्वतंत्र पंतप्रधानांचा विचार करण्याचाऐवजी कॉफी पिऊन झोप घेण्याची आवश्यकता आहे. तरीही त्यांना काही समजलं नाही तर त्यांना पाकिस्तानी पासपोर्टची आवश्यकता आहे',असा खरमरीत टोला गौतमनं हाणला आहे.

गौतमच्या या 'ट्विट'टीकेवर अब्दुल्ला यांनीही पलटवार केला आहे. अब्दुल्ला यांनी ट्विटमध्ये म्हटलं की,  'गौतम, मी कधीही जास्त क्रिकेट खेळलेलो नाही. कारण मला माहिती आहे या खेळामध्ये मी चांगला नाही. तुला जम्मू-काश्मीर, त्याचा इतिहास आणि जम्मू-काश्मीरसाठी नॅशनल कॉन्फरन्सनं दिलेलं योगदान याबाबत माहिती नाही. त्यामुळे तुला ज्या गोष्टींबाबत माहिती आहे त्याबाबत बोल. तू आयपीएलसंबंधी ट्वीट करायला हवे,'असे प्रत्युत्तर ओमर अब्दुल्ला यांनी गंभीराला दिलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एका रॅलीदरम्यान ओमर अब्दुल्ला यांच्या मागणीवरून काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला होता.

वाचा अन्य बातम्या

VIDEO : 'नवरा बदलण्याइतकं संविधान बदलणं सोप नाही', स्मृती इराणींबद्दल वादग्रस्त वक्तव्य

काँग्रेसच्या नेत्यांना देशद्रोह्यांचा पंतप्रधान व्हायचं का? - उद्धव ठाकरे

'....तर राजकारणातून संन्यास घेईन' - अजित पवार

VIDEO : रावसाहेब दानवे पुन्हा चुकले! विंग कमांडर अभिनंदनबद्दल केलं 'हे' वक्तव्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 2, 2019 07:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading