सर्वात मोठ्या माओवादी हल्ल्याने हादरली यंत्रणा, काय घडलं आतापर्यंत ?

150 जवानांच्या ताफ्यावर 300 माओवाद्यांनी एकदम हल्ला केला. अॅम्बूश लावून करण्यात आलेल्या या अंदाधूंद गोळीबारात 26 जवान शहीद झाले

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 24, 2017 10:00 PM IST

सर्वात मोठ्या माओवादी हल्ल्याने हादरली यंत्रणा, काय घडलं आतापर्यंत ?

24 एप्रिल :  माओवाद्यांचं केंद्र म्हणून ओळख असलेल्या सुकमा जिल्ह्यात पुन्हा माओवाद्यांनी त्यांची ताकद दाखवून दिली. रस्त्याच्या बांधकामाची पाहणी करायला गेलेल्या 150 जवानांच्या ताफ्यावर 300 माओवाद्यांनी एकदम हल्ला केला. अॅम्बूश लावून करण्यात आलेल्या या अंदाधूंद गोळीबारात 26 जवान शहीद झाले. माओवाद्यांनी फक्त हल्लाच केला नाही तर जवानांची सर्व शस्त्रास्त्रेही पळवून नेली.

सुकमा सारख्या आदिवासी आणि माओवादग्रस्त भागाला मुख्य प्रवाहात आणिण्यासाठी प्रशासनानं विकासकामांचा धडाका लावलाय. ज्याला माओवाद्यांचा विरोध आहे. त्यामुळे या विकासकामात अडथळे आणण्याची एकही संधी माओवादी सोडत नाहीत. इथल्या गावकऱ्यांच्या मदतीनं माओवाद्यांनी जवानांना घेरलं. त्यानंतर अॅम्बूश लावून जवानांवर हल्ला करण्यात आला. हल्यात रॉकेट लॉन्चरचा वापर करण्यात आल्याचंही जखमी जवानांचं म्हणणं आहे.

माओवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या सुकमा जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात किती हल्ले झालेत ?

15 एप्रिल 2015 - सुकमा जिल्ह्यात 7 जवान शहीद

एप्रील 2015 सुकमा जिल्हयात सात जवान शहीद

Loading...

4 मार्च 2016 सीआरपीएफचे 3 जवान शहीद

मार्च 2016  झालेल्या एका घटनेत 16 जवान शहीद

31 मार्च मध्येच एका घटनेत 7 जवान शहीद

बिहारच्या औरंगाबाद जिल्हयात  जुनमध्ये  दहा जवान शहीद

11 मार्च 2017 बारा जवान भेज्जीत शहीद

गेले दोन-तीन वर्षांपासून स्थानिक ग्रामस्थ हे माओवाद्यांच्या विरोधात जाऊन पोलीस आणि प्रशासनाला साथ देत होते, पण आज याच स्थानिक ग्रामस्थांनी जवानांची खबर माओवाद्यांना का दिली यावर आश्चर्य आणि चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 24, 2017 08:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...