भारत-पाकिस्तान अण्विक युद्ध झाल्यास...; 'हे' होतील भयानक परिणाम

भारत-पाकिस्तान अण्विक युद्ध झाल्यास...; 'हे' होतील भयानक परिणाम

खरच भारत आणि पाकिस्तान यांच्यात अण्विक युद्ध झाले तर...

  • Share this:

नवी दिल्ली, 05 ऑक्टोबर: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सध्या तणावाचे आहेत. सध्याच्या तणावाचे कारण ठरले ते जम्मू्-काश्मीरसाठीचे कलम 370 रद्द करण्याचा मोदी सरकारचा निर्णय होय. कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान(Imran Khan) यांनी अनेक वेळा दोन्ही देशांमध्ये अणुयुद्ध(Nuclear war) होण्याची शक्यता व्यक्त केली होती. यासंदर्भात अमेरिकेतील एका विद्यापीठाने एक संशोधन केले आहे. जर खरच भारत आणि पाकिस्तान यांच्यात अण्विक युद्ध झाले तर त्याचे काय परिणाम होतील हे या संशोधनातून सांगितले आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्याच जर खरच अण्विक युद्ध झाले तर 5 ते 12.5 कोटी लोकांचा एका आठवड्यात मृत्यू होतईल. ही संख्या दुसऱ्या महायुद्धाच्या काळात 6 वर्षात मृत्युमुखी पडलेल्या लोकांपेक्षा अधिक असेल. आजच्या घडीला भारत आणि पाकिस्तान यांच्याकडे प्रत्येकी 150च्या आसपास अणूबॉम्ब असतील. 2025पर्यंत ही संख्या 200पेक्षा अधिकवर पोहोचेल. अर्थात या युद्धाचे परिणाम केवळ भारत आणि पाकिस्तान यांच्यावरच नाही तर संपूर्ण पृथ्वीच्या वातावरण आणि तापमाणावर देखील होण्याची शक्यता या संशधोनातून व्यक्त केली आहे.

अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कोलोराडो बोल्डर अॅण्ड रटगर्स यांनी केलेल्या संशोधनातून भविष्यात अशा प्रकारचे युद्ध झाल्यास त्याचा जगावर किती भयानक परिणाम होईल याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या युद्धामुळे केवळ भारत आणि पाकिस्तान या देशातील नागरिकांचा मृत्यू होणार नाही तर अन्य देशांतील नागरिकांना त्याचा फटका बसू शकतो. अशा प्रकारच्या युद्धामुळे पृथ्वीच्या तापमानात घट होऊ शकते. कदाचित हिमयुगाच्या वेळ नोंदवण्यात आलेल्या तापमानाची नोंद होऊ शकते. अशा प्रकारच्या युद्धामुळे जगातील मृत्यूदर हा दुप्पट होऊ शकतो, असे ही या संशोधनात म्हटले आहे.

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी या संशोधनावर लक्ष द्यावे. कारण अशा प्रकारचे युद्ध झाले तर त्याचे परिणाम भयानक होऊ शकतात. अर्थात अणुयुद्ध होईल याचे कोणतेही उदाहरण नाही. पण अणुशक्ती हा एक मोठा धोका आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश अण्विक शक्ती वाढवत आहेत. त्यामुळे या गोष्टीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. ज्या ठिकाणी लोकसंख्या अधिक असते तेथे अशा गोष्टींचा सर्वाधिक धोका असते. त्याच या दोन्ही देशांमध्ये काश्मीर सारखा बिकट प्रश्न देखील असल्याचे या संशोधनात म्हटले आहे.

VIDEO: आरेतील झाडांवर रात्री कुऱ्हाड; 700 झाडं परत द्या! आंदोलकांचा आक्रमक पवित्रा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 5, 2019 08:07 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading