श्रीनगरमध्ये मशिदीबाहेर पाोलिसाची दगडानं ठेचून हत्या

श्रीनगरमध्ये मशिदीबाहेर पाोलिसाची दगडानं ठेचून हत्या

आज मोहम्मद अयूब दंगल नियंत्रण पथकात तैनात होते. मशिदीत बाहेर येणाऱ्या लोकांचे फोटो घ्यायला त्यांनी सुरुवात केली, यावरुन मशिदीतल्या लोकांमध्ये आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली.

  • Share this:

23 जून : जम्मू काश्मीरच्या नौहट्टा भागात एका जमावानं डीएसपी मोहम्मद अयूब यांची दगडांनी ठेचून हत्या केली. मोहम्मद अयूब यांची नौहट्टा इथल्या जामिया मशिदीजवळ ठेचून मारण्यात आलं. हा सगळा प्रकार सुरू होता तेव्हा हुर्रियत नेते मीर वाइज मशिदीमध्ये होते.

डीएसपी मोहम्मद अयूब पंडित जम्मू कश्मीर पोलिसांच्या सुरक्षा विभागात कार्यरत होते. या विभागाचे अधिकारी आणि जवान साध्या वेशात होते. आज मोहम्मद अयूब दंगल नियंत्रण पथकात तैनात होते. मशिदीत बाहेर येणाऱ्या लोकांचे फोटो घ्यायला त्यांनी सुरुवात केली, यावरुन मशिदीतल्या लोकांमध्ये आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला, त्यामुळे उद्रेक वाढत गेला. जमावानं त्यांना दगडांनी मारहाण केली, कपडेही फाडले,त्यांचा जागीच मृत्यू झाला.

त्यांच्या पथकातील तीनजणंही जखमी झाले. काही वेळापूर्वीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तीही हजर होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 23, 2017 12:25 PM IST

ताज्या बातम्या