VIDEO अडकलेल्या परप्रांतिय मजुरांचा उद्रेक, पोलिसांवर केली तुफान दगडफेक

 VIDEO अडकलेल्या परप्रांतिय मजुरांचा उद्रेक, पोलिसांवर केली तुफान दगडफेक

पोलीस पुढे जाऊ देतच नसल्याने मोठ्या संख्येने जमलेल्या या मजुरांच्या संयमाचा बांध अखेर फुटला. त्यामुळे त्यांनी दगडफेक करायला सुरुवात केली.

  • Share this:

गांधीनगर 02 मे : गुजरातमधल्या दाहोद इथं परप्रांतीय मजुरांचा आज उद्रेक झाला. पोलीस पुढे जाऊ देत नसल्याने या मजुरांनी थेट पोलिसांवरच तुफान दगडफेक केली. गेल्या महिनाभरापासून हे मजूर अडकून पडले असून इतर राज्यांमधल्या आपल्या घरी निघाले होते. गुजरातच्या खगेला हायवेच्या चौकीवर त्यांना पोलिसांनी थांबविले होते. आम्हाला पुढे जाऊ द्यावे अशी त्यांची मागणी होती. आपल्या राज्यात जाण्यासाठी गुजरातच्या विविध भागातून हे लोक आले आहेत. मात्र उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशच्या सीमा सील असल्याने तिकडे जाऊ नका अशी विनंती पोलिसांनी त्यांना केली होती. मात्र ते आपल्या मागणीवर अडून होते त्यातूनच ठिणगी पेटली.

पोलीस पुढे जाऊ देतच नसल्याने मोठ्या संख्येने जमलेल्या या मजुरांच्या संयमाचा बांध अखेर फुटला. त्यामुळे त्यांनी दगडफेक करायला सुरुवात केली. त्यांचा रेटा एवढा जास्त होता की अखेर पोलिसांनाच तेथून काढता पाय घ्यावा लागला. या दगडफेकीत पोलिसांच्या काही वाहनांचेही नुकसान झाले.

परिस्थिती गंभीर झाल्याने अखेर पोलिसांची अधिक कुमक मागविण्यात आली. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह अनेक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मजुरांना समजविण्याचा प्रयत्न केला.

लॉकडाऊनमध्ये मोदी सरकारने कोट्यवधी खात्यांमध्ये पाठवले पैसे,वाचा कशी काढाल रक्कम

कोरोनाव्हायरस (Coronavirus) संसर्गाच्या वाढत्या घटनांमध्ये केंद्र सरकारनं इतर राज्यामध्ये अडकलेल्या प्रवासी मजुरांना लॉकडाऊन (Lockdown 3.0) वाढविण्यापूर्वी विशेष गाड्यांमधून त्यांना त्यांच्या राज्यात नेण्याचे निर्देशित दिले आहेत.

रेल्वेनं चालवलेल्या विशेष गाड्यांना 'श्रमिक स्पेशल' असं नाव देण्यात आलं आहे. या गाड्या केवळ प्रवासी मजुरांसाठीच चालवल्या जाणार आहेत, ज्यांना लॉकडाऊनमुळे आपल्या राज्यांमध्ये जायचे आहे.

गृह मंत्रालयाने (MHA) रेल्वे मंत्रालयामार्फत चालवल्या जाणाऱ्या विशेष गाड्यांद्वारे देशभरातील विविध ठिकाणी अडकलेल्या प्रवासी कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर व्यक्तींच्या वाहतुकीस परवानगी देण्याचा आदेश जारी केला होता.

या लोकांचा प्रवास सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे मंत्रालयानं राज्ये / केंद्रशासित प्रदेशांशी समन्वय साधण्यासाठी नोडल ऑफिसर नेमले आहेत.

फक्त आता घरी जाऊदे पुन्हा येणारच नाही; लॉकडाऊनमुळे स्वप्नांची झाली राखरांगोळी

या व्यतिरिक्त रेल्वे मंत्रालयानं तिकिटांची विक्री केली आहे; रेल्वे स्थानक आणि रेल्वे प्लॅटफॉर्मवर सामाजिक अंतर आणि इतर सुरक्षा उपाय सुनिश्चित करण्यासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना देखील देण्यात आल्या आहेत. यानंतर लोक स्थानकांवर येऊ लागले. रेल्वेने यासंदर्भात अपील जारी केलं आहे.

First published: May 2, 2020, 5:39 PM IST

ताज्या बातम्या