इटावा, 9 ऑगस्ट : उत्तर प्रदेशातील इटावा येथील बकेवर येथे एख खळबळजनक घटना घडली आहे. येथे दोन मुलांनी संपत्तीच्या हव्यासापोटी जन्मदात्या बापावर गोळी चालवली व त्यांची हत्या केली. त्यानंतर मुलाने स्वत:चं पोलिसांना याबाबत माहिती दिली.
पोलिसांनी या प्रकरणात 3 आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या वादात एक आरोपी जखमी झाला असून पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं आहे. 6 ऑगस्ट रोजी बकेवर पोलीस ठाण्यात देवेंद्र सिंह यांना मिळालेल्या माहितीनुसार, 2 अज्ञातांनी त्यांच्या वडिलांवर गोळीबार करुन त्यांची हत्या केली आहे. सूचनेनंतर पोलीस तातडीने घटनास्थळी गेले असता त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील तपास सुरू केला. याच्या तपासासाठी पोलिसांनी 2 टीमचं गठन केलं. 9 ऑगस्ट रोजी बकेवर पोलीस तपास करीत होते.
यानंतर पोलिसांना आरोपीबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बंदोवस्त वाढवला. सुत्रांकडून मिळालेल्या सूचनेनंतर पोलिसांनी बाईक स्वारांना पकडण्यासाठी सापळ रचला. पोलिसांनी ठरविल्यानुसार ते पोलिसांच्या सापळ्यात अडकले. मात्र पोलिसांनी इशारा दिल्यानंतरही बाईक स्वार थांबत नसल्याने पोलिसांनी गोळीबार केला. यामध्ये एकाला गोळी लागली व तो जखमी झाला. त्यानंतर पोलिसांना बाईक स्वारांना ताब्यात घेतलं. त्यांच्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. पोलिसांनी हत्येत सहभागी असलेल्या सुशांत उर्फ विशाल, देवेंद्र भदौरिया आणि धर्मेंद्र भदौरिया यांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतलेल्यांनी सांगितले की मृतक आपल्या मुलांना जमिनीची हिस्सा देत नव्हते आणि जमिनीची वाटणीही करीत नव्हते. यामुळे दोन्ही मुलांनी मिळून आपल्या वडिलांची हत्या केली. पोलिसांनी आरोपीजवळ चौरीचा एक पल्सर मोटर सायकल, काडतूस आदी गोष्टी जमा केल्या आहेत.