भारतीय हवाई दलाची मोठी चूक! आपलंच हेलिकॉप्टर पाडल्याचा IAF प्रमुखांचा खुलासा

भारतीय हवाई दलाची मोठी चूक! आपलंच हेलिकॉप्टर पाडल्याचा IAF प्रमुखांचा खुलासा

भारताच्या मिसाइलने आपल्याच MI 17 हेलिकॉप्टरला पाडल्याचं चौकशीत समोर आलं आहे. या प्रकरणी दोघांवर कारवाई करण्यात आल्याचं हवाई दलप्रमुख भदौरीया यांनी स्पष्ट केलं.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 ऑक्टोबर : जम्मू काश्मीरमधील श्रीनगरमध्ये फेब्रुवारी महिन्यात भारतीय हवाई दलाचे एमआय 17 हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले होते. यावर हवाईदल प्रमुखांनी मोठा खुलासा केला आहे. या प्रकरणी कोर्ट ऑफ इन्क्वायरी पूर्ण झाली आहे. यामध्ये आपणच आपल्या हेलिकॉप्टरवर हल्ला केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी दोन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ही आमची सर्वात मोठी चूक होती आणि असं पुन्हा होणार नाही याकडे लक्ष देऊ असंही हवाई दल प्रमुख भदौरीया यांनी सांगितलं.

27 फेब्रुवारीला पाकिस्तानी विमानांनी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी भारताच्या मीग विमानांनी पाकिस्तानच्या एफ-16 या अत्याधुनिक विमानांचा पाठलाग केला होता. याच दरम्यान 'MI-17' हे हेलिकॉप्टर कामगिरीवर असतानाच कोसळलं होतं. हे हेलिकॉप्टर पाकिस्तानचं समजून भारतीय क्षेपणास्त्रांनी ते पाडलं होतं.

या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीने सखोल चौकशी करून अहवाल सादर केला. या प्रकरणात दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी नेमकी चूक काय झाली. यापुढे अशा घटना होऊ नयेत यासाठी काय करता येईल याबद्दलही या अहवालत काही सूचना करण्यात आल्या आहेत.

एअरस्ट्राईक कारवाईनंतर भारतीय हद्दीत बिथरलेल्या पाकिस्तानच्या एफ-16 लढाऊ विमान घुसखोरी केली होती. यावेळेस हवाईदलाच्या मिग-21 बायसन विमानानं पाकिस्तानचं एफ-16 विमान पाडलं. पाकिस्तानच्या एफ-16 लढाऊ विमानाचा पाठलाग करतानाच अभिनंदन वर्धमान यांचं मिग-21 विमान चुकून पाकिस्तानच्या हद्दीत शिरलं होतं. यानंतरही अभिनंदन हे सुरक्षित भारतात परत येऊ शकत होते. पण पाकिस्तानच्या कारस्थानामुळे त्यांना ते शक्य झालं नाही.

आपल्या हद्दीमध्ये शिरल्यानंतर पाकिस्तान आपल्या भारतीय सैनिकाला मारण्याच्या तयारीत होता. पण त्यांना जमलं नाही. अभिनंदन हे पाकच्या हद्दीत शिरताच त्यांना परत येण्याची सूचना देण्यात आली होती. पण पाकिस्तानकडून त्यांच्या कम्युनिकेशन सिस्टमलाच जाम करण्यात आलं होतं. त्यामुळे वॉर रुममधून आलेल्या सूचना अभिनंदन यांना ऐकू गेल्या नाही आणि त्यांना पाकिस्तानच्या हद्दीत उतरावं लागलं.

'हिन्दुस्तान टाइम्स'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, विंग कमांडर अभिनंदन यांच्या मिग-21 (MiG-21)मध्ये अँटी जॅमिंग टेकनिक असती तर त्यांच्यापर्यंत सूचना पोहचल्या असत्या आणि ते भारतात परत आले असते. पण यातच पाकिस्तानने रडीचा डाव खेळत अभिनंदन यांच्या विमानाची कम्यूनिकेशन सिस्टम जाम केली आणि त्यांना पाकिस्तानध्ये उतरण्यास भाग पाडलं.

14 फेब्रुवारी 2019 ला जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी 13 दिवसांनंतर भारतीय हवाई दलानं कुरापती पाकिस्तानविरोधात एअरस्ट्राईक केला आणि बालाकोट परिसरातील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त केली.

VIDEO: ठाण्यात गॅस पाईपलाईन फुटल्यानं उंच फवारे, परिसरातील गॅस पुरवठा बंद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 4, 2019 01:52 PM IST

ताज्या बातम्या