आमची लढाई काश्मीरसाठी, काश्मिरींच्या विरोधात नाही - नरेंद्र मोदी

आमची लढाई काश्मीरसाठी, काश्मिरींच्या विरोधात नाही - नरेंद्र मोदी

आमची लढाई ही काश्मिरींविरोधात नसून काश्मीरसाठी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

  • Share this:

टोंक, 23 फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या राजस्थानच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी 'आमची लढाई काश्मिरी लोकांच्या विरोधात नसून काश्मीरसाठी आहे' असं म्हटलं आहे. पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात संध्या संतापाचं वातावरण आहे. या हल्ल्यानंतर देशभरात काश्मीरी विद्यार्थी आणि लोकांविरोधात लोकांमध्ये राग दिसून येत आहेत. परिणामी काश्मिरींना मारहाण झाल्याच्या अनेक घटना देखील देशभरातून समोर आल्या आहेत. या घटनांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केला आहे. काश्मिरींना सध्या देशातील अनेक भागात मारहाण होत आहे. ही बाब निषेधार्ह आहे. आमची लढाई ही काश्मिरींच्या विरोधात नसून काश्मीरसाठी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी म्हटलं आहे.

">

तर,काश्मीरच्या लोकांचं, विद्यार्थ्यांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य असल्याचं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. टोंक येथे झालेल्या जाहीर सभेत नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड देखील उपस्थित होते.

इम्रान खान यांना सुनवालं

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इम्रान खान यांना देखील काश्मीरच्या मुद्यावर झालेल्या चर्चेची आठवण करून दिली. 'इम्रान खान पंतप्रधान झाल्यानंतर मी त्यांना अभिनंदन करण्यासाठी फोन केला. तेव्हा मी त्यांना आत्तापर्यंत आपण खूप भांडलो. आता गरिबी आणि अशिक्षितपणाच्या मुद्याविरोधात भांडून त्यांना संपवूया' असं म्हटलं होतं. त्यावेळी इम्रान यांनी देखील त्याला होकार दिला होता. आता दिलेला शब्द पाळण्याची वेळ आली आहे. अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी इम्रान खान यांना कानपिचक्या दिल्या आहेत.

आम्ही शहिदांच्या कुटुंबासोबत

पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबासोबत सारा देश आणि जग उभं असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारताना अतिरेक्यांसह पाकिस्तानला देखील इशारा दिला आहे.

VIDEO : Pulwama : 'खून का बदला लिया', नागपुरात मोदी-गडकरींचे पोस्टर्स

First published: February 23, 2019, 4:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading