‘आमची मुलगी कोरोना पॉझिटिव्ह’, लग्नासाठी मुलगी कोर्टात आल्यावर कुटुंबीयचं ओरडले; वकिलालाही फुटला घाम

‘आमची मुलगी कोरोना पॉझिटिव्ह’, लग्नासाठी मुलगी कोर्टात आल्यावर कुटुंबीयचं ओरडले; वकिलालाही फुटला घाम

अनेकदा कोरोनाची लागण झाली तरी ते लपवण्याचा प्रयत्न करीत असतात, इथं तर भलताच प्रकार घडला

  • Share this:

इंदूर, 27 जुलै : सध्या देशभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. अशा परिस्थितीत अनेकजण त्याचा दुरुपयोगही करीत असल्याचे दिसत आहे. अशातच मध्य प्रदेशात एक विचित्र घटना समोर आली आहे.

येथे लग्नासाठी गेलेल्या एका मुलीच्या कुटुंबीयांनाहीच सर्वांसमोर आमची मुलगी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे ओरडून सांगितले. यानंतर सर्वचजण घाबरले. सध्या कोरोनाची लागण झाल्यानंतरही अनेकजण ते लपविण्याचा प्रयत्न करीत असताना हे आमची मुलगी पॉझिटिव्ह असल्याचे ओरडून का बरे सांगतं आहेत, असा प्रश्न सर्वांना पडला.

हे वाचा-रुग्णवाहिका आलीच नाही, कोरोनाबाधित पोलिसाने रात्रभर ड्युटी केली अन् सकाळी...

त्याची खरी गोष्ट अशी की, ही मुलगी प्रेम असलेल्या मुलासोबत लग्न करण्यासाठी कोर्टात आली होती. यावेळी तिचे कुटुंबीयही तिच्या सोबत कोर्टात आले. त्यातच मुलीच्या नातेवाईकांनी आमची मुलगी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा आरडोओरडा सुरू केला. यानंतर कोर्टात एकच गोंधळ माजला. लग्न करण्यासाठी मुलगी मध्य प्रदेशच्या खांडवा येथील कोर्टात आली होती. रजिस्टर पद्धतीने ती लग्न करणार होती. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

हे वाचा-फक्त बोलत नाही करुन दाखवतो; शेतात राबणाऱ्या मुलींसाठी सोनूने पाठवला ट्रॅ्क्टर

विवाह नोंदणीसाठी कागदपत्रांवर नाव सांगण्याआधीच मुलीचे नातेवाईक कोर्टात पोहोचले. आणि मुलगी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा ओरड सुरू केला. यानंतर घाबरलेले मुलाचे नातेवाईक त्याला क्वारंटाईन करण्यासाठी घेऊन गेले. इथे कोर्टात टायपिस्टपासून ते वकील सर्वजण लांब उभे राहिले. आणि काहीही टाइप करायला नकार दिला. पुढील प्रक्रिया करण्यासाठी आधी कोरोना चाचणी करुन ये असा सल्लाही दिला. जिल्हा आरोग्य विभागानुसार मुलीला कोरोनाची लागण झाल्याचा कोणताही रिपोर्ट नाही. मुलीच्या नातेवाईकांना हे लग्न मान्य नसल्याने त्यांनी हा गोंधळ घातला.

Published by: Meenal Gangurde
First published: July 27, 2020, 5:11 PM IST

ताज्या बातम्या