कचऱ्यात सापडलेल्या ‘लक्ष्मी’ला मिळाला आयुष्याचा जोडीदार, पाठवणीवेळी अनाथ आश्रमातील सर्वांचेच डोळे पाणावले

कचऱ्यात सापडलेल्या ‘लक्ष्मी’ला मिळाला आयुष्याचा जोडीदार, पाठवणीवेळी अनाथ आश्रमातील सर्वांचेच डोळे पाणावले

आयुष्यात चांगला जोडीदार मिळणे ही अतिशय मोलाची गोष्ट. या अनाथ मुलीला एका सुंदर सोहळ्यात जोडीदार मिळाला.

  • Share this:

सुरत, 23 जानेवारी : अनाथ (orphan) मुला-मुलींचं जगणं अनेकदा संघर्ष आणि एकाकीपणानं भरलेलं असतं. मात्र तरुणपणात त्यांना चांगला जोडीदार (life partner) मिळाला तर हे चित्र बदलू शकतं.

अशीच सुखद गोष्ट गुजरात मधील सुरत (Surat) याठिकाणी घडली आहे. इथं अनाथ म्हणून एका संस्थेत वाढलेली लक्ष्मी एका सुंदर सोहळ्यात कश्यप मेहतासोबत या तरुणाबरोबर विवाहबद्ध झाली. लक्ष्मी 4 वर्षांची होती तेव्हा या बालाश्रम संस्थेत (Balashram orphanage) राहायला आली होती. आता तिच्या पाठवणीवेळी आश्रमात उपस्थित सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आलं.

सुरतच्या कतारगाम भागातल्या या आश्रमात राहणारी लक्ष्मी आता 18 वर्षांची झाली आहे. ती केवळ 4 महिन्यांची होती, तेव्हा काही लोकांनी तिला एका कचऱ्याच्या डब्याजवळ ठेवलं होतं. त्यानंतर तिचं सर्व पालनपोषण आश्रमानं केलं. आता लक्ष्मी दहावी उत्तीर्ण झाली आहे. याशिवाय ती खेळ आणि योगामध्येही कुशल आहे. कराटेमध्येही तिनं ब्लॅक बेल्ट मिळवला आहे.

(हे वाचा-मोदी सरकारच्या या पेन्शन योजनेमध्ये करताय गुंतवणूक?अशाप्रकारे तपासा तुमचं योगदान)

लक्ष्मीचं कन्यादान बालाश्रमाच्या ट्रस्टींनी केलं. बालाश्रमातच झालेल्या या लग्नात आश्रमाच्या ट्रस्टींनी कसलीच कसर राहू दिली नाही. आश्रमाच्या अंगणातच मंडप टाकलेला होता. लक्ष्मीचं लग्न (marriage) ज्याच्याशी झालं तो कश्यप मेहता संगीताचे वर्ग घेतो. कश्यपचे वडील (father) मेहुलभाई स्पोकन इंग्लिशचे क्लास घेतात. मेहुलभाई स्वतः बालाश्रमाशी जोडलेले आहेत. यातूनच त्यांची भेट लक्ष्मीशी झाली. या भेटीत मेहुल यांना लक्ष्मीला आपली सून (daughter in law) बनवण्याची इच्छा झाली.

(हे वाचा-शेतकऱ्यांच्या आंदोलनात शूटरला पकडले, 4 शेतकरी नेत्यांवर रचला होता गोळीबाराचा कट)

त्यांनी आपली इच्छा ट्रस्टीजना बोलून दाखवली. त्यांनी आनंदानं होकार दिल्यावर लक्ष्मीचं लग्न ठरलं. बालाश्रमामध्ये अनेक दिवसांपासून लग्नाची जय्यत तयारी सुरू होती. मेहंदी, संगीत असे सगळे कार्यक्रम उत्साहात झाले. सुंदर लग्नसोहळा पार पडल्यावर लक्ष्मीची भावपूर्ण पाठवणी झाली. या सोहळ्याला उपस्थित अनेकांमध्ये या अनोख्या नात्याची चर्चा रंगली होती.

Published by: News18 Desk
First published: January 23, 2021, 2:53 PM IST

ताज्या बातम्या