'ऑपरेशन ऑल आऊट'चा थरार, मोस्ट वॉन्टेंड दहशतवाद्यांचा असा झाला खात्मा!

'ऑपरेशन ऑल आऊट'चा थरार, मोस्ट वॉन्टेंड दहशतवाद्यांचा असा झाला खात्मा!

'ऑपरेशन ऑल आऊट'मुळे दहशतवादाचं कंबरडं मोडलं गेलं. पण पुलवामा हल्ल्यामुळे सुरक्षा दलाला आता डावपेचांची नव्याने आखणी करावी लागणार आहे.

  • Share this:

श्रीनगर 15 फेब्रुवारी :  : जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कर आणि सुरक्षा दलानं अतिरेक्यांविरूद्ध छेडलेल्या मोहिमेला मोठं यश मिळालं होतं. गेल्या दोन वर्षापासून ही मोहीम राबवून सुरक्षा दलाने मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांना ठार केलं होतं. मात्र पुलवामाच्या आत्मघातकी हल्ल्याने सुरक्षा दलाला मोठा धक्का बसलाय. गेल्या वर्षभरात सुरक्षा दलांनी मारलेल्या अतिरेक्यांची संख्या  250 पर्यंत जाणारी आहे. या ऑपरेशनने दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलं होतं मात्र नव्याने भरती होणाऱ्या दहशतवाद्यांची संख्या वाढल्याने सुरक्षा दला समोरचं आव्हान काही संपलेलं नाही.

हिवाळ्यात जास्त घुसखोरी?

दरवर्षी हिवाळा सुरू होण्याआधी काश्मिरात घुसखोरीत वाढ होते. हिमवर्षाव सुरू होण्याआधी अतिरेकी पाकिस्तान सीमेवरून भारतात घुसण्याचा प्रयत्न करतात. हिमवर्षावाला सुरुवात झाल्यानंतर त्यांना दऱ्या खोऱ्यातून वाट काढणं शक्य नसतं. त्यामुळं नोव्हेंबर महिन्यात हे अतिरेकी नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न करतात. पाकिस्तानी सैन्य या अतिरेक्यांना संरक्षण देण्यासाठी प्रचंड गोळीबार करतं त्यामुळं सुरक्षा दलाला ही घुसखोरी रोखणं आव्हान असंत.

ऑपरेशन ऑल आऊट

गेल्या दोन वर्षांपासून लष्करानं पोलिसांच्या मदतीनं अतिरेक्यांविरूद्ध धडक मोहिम सुरू केलीय. या मोहिमेत लष्करानं मोस्ट वॉन्टेंड दहशतवाद्यांची एक यादी तयार केली आणि त्या प्रत्येकाला शोधून ठार करण्याचं उद्दीष्ट ठेवलं. त्या पहिल्या यादीतल्या जवळपास सर्व दहशतवाद्यांना लष्करानं ठार केलं. ही यादी काही महिन्यानंतर सतत बदलत राहते.

याच मोहिमेत बुऱ्हान वाणी ठार झाला होता. अतिरेक्यांविरूद्धच्या मोहिमेत बचावात्मक पवित्रा न घेता आक्रमक धोरण सुरक्षा दलानं स्वीकारलं असून केंद्र सरकारनं सुरक्षा दलांना पूर्ण स्वातत्र दिलंय. त्यामुळं धड मोहिम राबविण्यात लष्कराला यश आलंय.

भरती रोखण्याचा प्रयत्न

ही मोहिम राबवत असतानाच दहशतवादी संघटनांमध्ये सामील होणाऱ्या काश्मिरी युवकांना रोखण्यासाठीही लष्करानं खास मोहिम राबवलीय. स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणं, त्यांना शिक्षणाकडे वळवणं आणि पालकांचं प्रबोधन करणं हाही या मोहिमेचा एक भागच आहे.

अतिरेक्यांना रोखण्यासाठी केवळ गोळी हे उत्तर नसून 'गोलीसे नही, गले लगानेसे'ही काश्मीर प्रश्न सुटेल असं पंतप्रधानांनी म्हटलं होतं. त्यामुळं राजकीय आणि लष्कर या दोनही मार्गावर लष्कराला आणि प्रशासनाला चालावं लागणार आहे.

First published: February 15, 2019, 5:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading