राष्ट्रपतीपदासाठी मीरा कुमार यांची उमेदवारी दाखल

काँग्रेस नेत्या आणि लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांनी आज राष्ट्रपतीपदासाठीचा उमेदवारी अर्ज सादर केलाय. यावेळी सोनिया गांधी, राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह इतरही काँग्रेस नेते उपस्थित होते.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 28, 2017 02:01 PM IST

राष्ट्रपतीपदासाठी मीरा कुमार यांची उमेदवारी दाखल

28 जून : काँग्रेस नेत्या आणि लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांनी आज राष्ट्रपतीपदासाठीचा उमेदवारी अर्ज सादर केलाय. यावेळी सोनिया गांधी, राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह इतरही काँग्रेस नेते उपस्थित होते. युपीएच्या वतीने त्यांचा हा उमेदवारी अर्ज दाखल केलाय.

दरम्यान, एनडीएतर्फे रामनाथ कोविंद यांनी गेल्याच आठवड्यात उमेदवारी दाखल केलीय. एनडीएचं बहुमत लक्षात कोविंद यांचा विजय ही केवळ औपचारिकतe मानली जातेय तरीही काँग्रेसनं मीरा कुमार यांना मैदानात उतरवलं आहे. एनडीएच्यावतीने यावेळी राष्ट्रपतीपदासाठी दलित उमेदवार देण्यात आलाय त्याला प्रत्युत्तर म्हणून मग युपीएने प्रथमच दलित महिलेला राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देऊ केलीय.

मीरा कुमार या साबरमती आश्रमापासून प्रचाराला सुरुवात करणार आहेत. तसंच येत्या 1 तारखेला त्या पटनाहून दिल्लीला जाणार आहेत तिथे त्या यूपीएच्या घटकपक्षांशी चर्चा करतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 28, 2017 02:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...