शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून पंतप्रधानांनी विरोधी पक्षांवर केला गंभीर आरोप

शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून पंतप्रधानांनी विरोधी पक्षांवर केला गंभीर आरोप

कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचं नुकसान सरकार होऊ देणार नाही. त्यांना योग्य माहिती देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 15 डिसेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज गुजरात (Gujarat) च्या एक दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यांत त्यांनी कृषी विधेयकाच्या संदर्भात (Farm laws)  शेतकऱ्यांच्या विविध गटांशीही चर्चा केली. देशात सध्या या विधेयकावरून शेतकऱ्यांचं आंदोलन (Farmers Protest)  सुरू आहे. त्यामुळे पंतप्रधानांची ही चर्चा महत्त्वाची मानली जातेय. त्यानंतर एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी विरोधी पक्षांवर गंभीर आरोप केलाय. विरोधी पक्ष हे शेतकऱ्यांची दिशाभूल करून चिथावणी देत असल्याचं पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले, सत्तेत असताना याच पक्षांनी कृषी क्षेत्रात सुधारणांची मागणी केली होती. मात्र आज जेव्हा आम्ही त्या सुधारणा करत आहोत तेव्हा केवळ राजकारण करण्यासाठी त्या सुधारणांना विरोध केला जात आहे. सरकार शेतकऱ्यांची पूर्ण काळजी घेत आहे. शेतकऱ्यांच्या प्रशांची सरकारला चांगल्या प्रमाणात जाणीव आहे. शेतकऱ्यांच्या हिताची केंद्र सरकारने पूर्ण काळजी घेतली असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं.

दिल्लीत शेतकऱ्याचं जे आंदोलन सुरू आहे त्यावर बोलतांना पंतप्रधान म्हणाले, या शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे. त्यांना योग्य माहिती देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचं नुकसान सरकार होऊ देणार नाही अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

दरम्यान, सिंघू सीमेवर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या व्यवस्थेवर टीका करण्यात येत आहे. आंदोलन स्थळी वैविध्यपूर्ण भोजनाचीही व्यवस्था आहे. बारमी आणि बोपाराई गावातील शेतकऱ्यांच्या भारतीय किसान संघटनेनं (Bhartiya Kisan Sanghtana) चहा, खाणं देण्याची व्यवस्था केली होती, आता तर त्यांनी पिझ्झा लंगर (Pizza Lunger) सुरू केला आहे. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचे मनोधैर्य टिकून रहावे यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना समाजातील अनेक स्तरांवरून मदत मिळत असून, त्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या मदतीबद्दल आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या वेबसाईटवर दखल घेतली जात असून प्रशंसेसह त्याबाबत माहिती दिली जात आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 15, 2020, 5:41 PM IST

ताज्या बातम्या