नवी दिल्ली 04 फेब्रुवारी : इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वाद शांत होण्याची अजुन चिन्ह अजुन दिसत नाही. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सोमवारी रात्री निवडणूक आयुक्तांची भेट घेतली आणि विरोधी पक्षांना वाटत असलेल्या शंकांबाबत चर्चा केली. लोकसभेच्या होणाऱ्या निवडणुकीत VVPAT मशिन्सचं प्रमाण 50 टक्क्यांवर आणावं अशी मागणी केल्याची माहिती काँग्रेसचे नेते गुलाब नबी आझाद यांनी दिली आहे.
विरोधी पक्षांच्या मनातली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबतची भीती अजुन गेलेली नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी, तेलुगु देसम, कम्युनिष्ट पार्टीसह अनेक पक्षांच्या नेत्यांचं एक शिष्टमंडळात आज निवडणूक आयुक्तांना भेटलं आणि त्यांना आपल्या शंका सांगितल्या.
काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकांमुळे मतपत्रिकांचा वापर शक्यच नसल्याचं आयोगाने नेत्यांना सांगितलं. तर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी VVPAT मशिन्सचं प्रमाण 50 टक्क्यांवर नेण्याची मागणी केली.
आयोगाने एका तज्ज्ञ समितीची नियुक्ती केली असून ही समिती आणखी काय सुधारणा करता येतील याच्या सूचना आयोगाला करणार आहे.
गेल्या महिन्यात लंडनमध्ये एका हॅकरने पत्रकार परिषद घेऊन काही गौप्यस्फोट केले होते. त्यानंतर पुन्हा वाद चिघळला होता.
VIDEO : 'या' तीन अभिनेत्रींनी केलं कमी वयाच्या प्रियकराशी लग्न