राधाकृष्ण विखे पाटील यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा?

राधाकृष्ण विखे पाटील यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा?

पुत्र सुजयच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात नाराजीचा सूर होता.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 मार्च : विधानसभेतील विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्याचे समजते. त्यांचा मुलगा सुजयने भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर होता. सुजयचा मुद्दा व्यवस्थित हाताळता आला नसल्याचे काँग्रेस हायकमांडचे म्हणणे होते. मात्र, या वृत्ताचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी खंडण केलं आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय यांच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी नाराजी व्यक्त केलीय. दिल्लीत राहुल गांधी, मल्लिकार्जून खर्गे आणि शरद पवारांची बैठक झाली. सुजय विखेंचा प्रश्न योग्यरितीनं न हाताळल्याबद्दल तसंच त्यांच्या भाजप प्रवेशावरून काँग्रेस हायकमांडमध्ये नाराजी आहे. सुजयचा मुद्दा व्यवस्थित न सोडवल्याची हायकमांडची भावना आहे.

राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवारांची एकत्रित चर्चा झाली. यात महाराष्ट्रातील स्थितीबाबत आणि जागावाटपावर तासभर चर्चा करण्यात आल्याचे समजते. महाराष्ट्रातील आघाडीच्या जागावाटपाचं चित्र लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)

VIDEO: लज्जास्पद ! पुण्यात तरुणीचा विनयभंग, घटना सीसीटीव्हीत कैद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 19, 2019 01:38 PM IST

ताज्या बातम्या