Opinion poll Bihar: नितीश कुमारांनाच लोकांची पुन्हा पसंती, ‘काँग्रेस-राजद’ला धक्का

Opinion poll Bihar: नितीश कुमारांनाच लोकांची पुन्हा पसंती, ‘काँग्रेस-राजद’ला धक्का

बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी 28 ऑक्टोबरपासून 3 टप्प्यात मतदान होणार असून 10 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 24 ऑक्टोबर: बिहार विधान सभेच्या निडणुकांसाठी प्रचार आता शिगेला पोहोचला असून मतदानाच्या पहिल्या टप्प्याला फक्त 4 दिवस राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर Opinion poll येत असून त्यात नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली  NDAलाच पूर्ण बहुमत मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ‘ABP- C VOTER’ यांनी केलेल्या Opinion pollमध्ये लोकांनी नितीश कुमार यांनाच पसंती दिली असून इतर प्रतिस्पर्ध्यांपेक्षा ते कितीतरी पुढे आहेत.

बिहार विधानसभेत एकूण 243 जागा आहेत. या सर्व जागांवर होणाऱ्या मतदानाच्या टक्केवारीचा अंदाज घेऊन नितीश कुमार यांच्या NDAला 43 टक्के राजदकाँग्रेसच्या महाआघाडीला 35 तर लोक जनशक्तीला 4 टक्के तर इतर पक्षांना 18 टक्के मतदान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

तर आकड्यांमध्ये NDAला 135-159, महाआघाडी 77-98, लोक जनशक्ती 1-5 तर अन्य पक्षांना 4-8 एवढ्या जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

VIDEO : रामलीला सुरू असताना अंगद झालेल्या मनोज तिवारींनी रावणाला म्हटलं...

या आधी जाहीर झालेल्या लोकनीती आणि CSDSच्या ओपिनियन पोलमध्येही नितीश कुमारांचीच सरशी होणार असाच अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

लोकनीती आणि CSDSचा ओपिनियन पोल

यात NDA ला 133-143 जागा, महाआघाडीला 88-98, लोकजनशक्ती 2-6 तर इतर पक्षांना 6 ते 10 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ‘आज-तक’ने याबाबतचं वृत्त दिलं होतं. लोकांनी नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्रीपदासाठी पहिली पसंती दिली आहे. त्यांना 31 टक्के लोकांनी मुख्यमंत्री म्हणून पसंती दिलीय तर राजदचे तेजस्वी यादव यांना 27 टक्के लोकांनी पसंती दाखवलीय.

बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी  28 ऑक्टोबरपासून 3 टप्प्यात मतदान होणार असून 10 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

बिहारमध्ये निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 28 ऑक्टोबरला, दुसऱ्या टप्प्यात  3 नोव्हेंबरला तर तिसऱ्या टप्प्यात 7 नोव्हेंबरला मतदान होईल. तर 10 नोव्हेंबरला मतमोजणीनंतर निवडणुकीचे निकाल समोर येतील.  दरम्यान,  विधानसभेचा कार्यकाळ 29 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यामुळं नवीन सरकार हा कार्यकाळ संपण्याआधी स्थापन होणं गरजेचं आहे.

‘आम्ही देशविरोधी नाही, तर भाजप विरोधी’ 370साठी लढा उभारण्याची घोषणा

निवडणुकीसाठी एक तास मतदानाची वेळ वाढविण्यात आली आहे.  सकाळी 7  ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान होणार आहे. शेवटच्या एका तासात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. सुरक्षेची सर्व काळजी घेऊन हे मतदान होणार असल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं होतं.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 24, 2020, 8:03 PM IST

ताज्या बातम्या