Home /News /national /

Opinion poll Bihar: NDAला स्पष्ट बहुमत, नितीश कुमारांची जादू कायम

Opinion poll Bihar: NDAला स्पष्ट बहुमत, नितीश कुमारांची जादू कायम

Patna: Bihar Chief Minister Nitish Kumar with Deputy Chief Minister Sushil Kumar Modi during Makar Sankranti festival celebration in Patna, Wednesday, Jan. 15, 2020. (PTI Photo)(PTI1_15_2020_000063B)

Patna: Bihar Chief Minister Nitish Kumar with Deputy Chief Minister Sushil Kumar Modi during Makar Sankranti festival celebration in Patna, Wednesday, Jan. 15, 2020. (PTI Photo)(PTI1_15_2020_000063B)

आश्चर्य म्हणजे 55 टक्के भाजप समर्थकांनीही नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असावेत असं म्हटलेलं आहे. 93 टक्के जेडेयू समर्थकांनी नितीश कुमारांना पसंती दिली आहे.

    नवी दिल्ली 20 ऑक्टोबर: बिहार विधानसभा निवडणुकांचा प्रचार आता रंगात येत आहे. राज्यात वातावरण तापलेलं असतानाच निवडणुकीचा रागरंग सांगणारा पहिला Bihar Assembly Election 2020 Opinion poll जाहीर झाला आहे. यात नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखील NDAला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर नितीश कुमार यांची जादू कायम असल्याचंही त्यात स्पष्ट होत आहे. लोकनीती आणि CSDS यांनी हा सर्व्हे केला आहे. यात NDA ला 133-143 जागा, महाआघाडीला 88-98, लोकजनशक्ती 2-6 तर इतर पक्षांना 6 ते 10 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ‘आज-तक’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. लोकांनी नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्रीपदासाठी पहिली पसंती दिली आहे. त्यांना 31 टक्के लोकांनी मुख्यमंत्री म्हणून पसंती दिलीय तर राजदचे तेजस्वी यादव यांना 27 टक्के लोकांनी पसंती दाखवलीय. 38 लोकांना NDAचं सरकार यावं असं वाटतं तर 32 टक्के लोकांना महाघाडीचं सरकार हवं आहे. तर 6 टक्के लोकांनी लोकजनशक्तीच्या पारड्यात आपलं मत नोंदवलं आहे. आश्चर्य म्हणजे 55 टक्के भाजप समर्थकांनीही नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असावेत असं म्हटलेलं आहे. 93 टक्के जेडेयू समर्थकांनी नितीश कुमारांना पसंती दिली आहे. Pulwama Encounter: सुरक्षा दलांनी केला LeTच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा लोकनीती-सीएसडीएस च्या  ओपिनियन पोलमध्ये 37 मतदारसंघातल्या 148 मतदान केंद्रावर ही मतं घेण्यात आलीय. यात 3731 नागरीकांशी प्रत्यक्ष बोलून त्यांचं मत विचारण्यात आलं. हा सर्वे 10 ते 17 ऑक्टोबर या काळात करण्यात आला. यात 60 टक्के पुरूष तर 40 टक्के महिलांचा समावेश आहे. यात ग्रामीण भागात 90 टक्के तर शहरी भागातल्या 10 टक्के लोकांचा समावेश आहे. बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी  28 ऑक्टोबरपासून 3 टप्प्यात मतदान होणार असून 10 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. बिहारमध्ये निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 28 ऑक्टोबरला, दुसऱ्या टप्प्यात  3 नोव्हेंबरला तर तिसऱ्या टप्प्यात 7 नोव्हेंबरला मतदान होईल. तर 10 नोव्हेंबरला मतमोजणीनंतर निवडणुकीचे निकाल समोर येतील.  दरम्यान,  विधानसभेचा कार्यकाळ 29 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यामुळं नवीन सरकार हा कार्यकाळ संपण्याआधी स्थापन होणं गरजेचं आहे. PM Modi : विसरू नका lockdown संपला तरी coronavirus संपलेला नाही निवडणुकीसाठी एक तास मतदानाची वेळ वाढविण्यात आली आहे.  सकाळी 7  ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान होणार आहे. शेवटच्या एका तासात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. सुरक्षेची सर्व काळजी घेऊन हे मतदान होणार असल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं होतं.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Bihar Election

    पुढील बातम्या