Home /News /national /

Opinion poll: अमित शहा VS अरविंद केजरीवाल, वाचा कोण जिंकणार दिल्लीचा गड?

Opinion poll: अमित शहा VS अरविंद केजरीवाल, वाचा कोण जिंकणार दिल्लीचा गड?

भारतीय जनता पक्षाच्यावतीने जवळपास 400 पेक्षा जास्त नेते दिल्ली विधानसभेसाठी प्रचार करीत आहे

    नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी : दिल्ली निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. दिल्लीत कोण सत्ता स्थापन करणार याबाबत सर्वांमध्येच उत्सुकता आहे. राजकीय पक्षांनीदेखील त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत एकूण 70 जागा आहेत. निवडणुकांपूर्वी विविध संस्थांचे ओपिनियन पोल सादर होतात. या ओपिनियन पोलनी मात्र आम आदमी पक्षाला हिरवा कंदील दिला आहे. दिल्लीमध्ये पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. टाइम्स नाऊ-IPSOS ओपिनियन पोलनुसार, दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी मजबूत असून या निवडणुकीत ते 54-60 जागांवर शिक्कामोर्तब करू शकतात. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाला 10-14 जागांवरच समाधान मानावे लागणार आहे. टाइम्स नाऊ-IPSOS ओपिनियन पोलनुसार, कॉंग्रेसलादेखील केवळ 2 जागा मिळण्याची शक्यता आहे. दिल्ली विधानसभेच्या एकूण 70 जागा आहेत. या पोलनुसार जर आता दिल्लीमध्ये लोकसभा निवडणुका झाल्या तर सर्व 7 जागांवर भाजप बाजी मारू शकते. सध्या दिल्लीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभा होत आहेत. दिल्ली विधानसभेची निवडणूक दिल्लीचं भविष्य निश्चित करणार असून मी देश बदलला आहे आता दिल्ली बदलण्याची वेळ आली आहे, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पहिल्या प्रचारसभेत केलं होतं. भारतीय जनता पक्षाच्यावतीने जवळपास 400 पेक्षा जास्त नेते दिल्ली विधानसभेसाठी प्रचार करीत आहे. भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री देखील प्रचार सभांमध्ये सहभागी होऊन मत मागत आहेत. आम आदमी पार्टीचे 52 टक्के मतांचं शेअर आपला 52 टक्के मतदान होण्याची शक्यता असून भाजपला 34 टक्के मतदान होऊ शकते. आम आदमी पक्षाला 60 पर्यंत जागा जिंकता येऊ शकतात. मात्र 2015च्या तुलनेत ही संख्या कमी असून ‘आप’च्या वोट शेअरमध्ये 2.5 टक्के घट झाली आहे. तर भाजपलादेखील 1.7 टक्के मतांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. PM पदासाठी मोदींना पसंती जर आता लोकसभा निवडणुका झाल्या तर भाजपला 46 टक्के आणि आपला 38 टक्के मतं मिळू शकतात. नरेंद्र मोदीना PM पदासाठी पसंती मिळत आहे. पोलनुसार 75 टक्के मतं ही मोदींसोबत असून केवळ 8 टक्के मतं ही राहुल गांधी यांनी PM पदावर पाहू इच्छितात. 71 टक्के जनता CAA च्या समर्थनार्थ नागरिकत्व संशोधन कायदा (CAA) संदर्भात प्रश्न विचारला असता 71 टक्के जनता केंद्र सरकारच्या निर्णयाचे समर्थन करतात. याशिवाय 52 टक्के लोक शाहीन बाग आंदोलना विरोधात आहे. तर 25 टक्के लोक आंदोलनकर्त्यांच्या समर्थनार्थ आहेत. उरलेले 24 टक्के लोक या प्रकरणात मतप्रदर्शन करू इच्छित नाहीत. 7,321 सॅंपलच्या आधारावर सर्व्हे  रिपोर्ट टाइम्स नाऊ-IPSOS ओपिनियन पोलमध्ये 7,321 लोकांचं मत घेण्यात आलं असून त्यांनी दिल्लीतील विविध भागांतून निवड करण्यात आली. 27 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या दरम्यान लोकांचे मत घेण्यात आले.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Amit Shah, Arvind kejrival, Delhi election, Naredra modi

    पुढील बातम्या