Home /News /national /

काँग्रेसचा बडा मराठमोळा नेता करणार का बंड? आमदार गायब झाल्यामुळे ऑपरेशन लोटसची जोरदार चर्चा

काँग्रेसचा बडा मराठमोळा नेता करणार का बंड? आमदार गायब झाल्यामुळे ऑपरेशन लोटसची जोरदार चर्चा

काँग्रेसचे 6 मंत्री आणि 11 आमदार गायब आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशात ऑपरेशन लोटसच्या चर्चांना उधाण आलं आहे.

    भोपाळ, 9 मार्च :  मध्य प्रदेशात कमलनाथ यांचं सरकार अडचणीत येण्याची चिन्हं आहेत. काँग्रेस सरकारमधले काही मंत्रीच बंडखोरीच्या पवित्र्यात असल्याचं बोललं जात आहे. असं झालं तर काँग्रेसचं सरकार अल्पमतात येऊ शकतं. काँग्रेसचे 6 मंत्री आणि 11 आमदार बंगळुरूमध्ये असल्याचं बोललं जात आहे. या सर्वांचे फोन स्वीच ऑफ आहेत आणि ते कुठे आहेत याची अधिकृत माहिती अद्याप दिली गेलेली नाही. हे सर्व आमदार आणि मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे मध्ये प्रदेशातला हा मराठमोळा काँग्रेस नेता बंड करणार का असा प्रश्न विचारला जात आहे. मध्य प्रदेशात राजकीय संकट येऊ शकतं याची चिन्हं गेल्या काही दिवसांपासून दिसत होतं. मध्य प्रदेशात काँग्रेस सत्ता काबीज करणार अशी परिस्थिती निर्माण झाली त्याच वेळी ज्योतिरादित्य शिंदे यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे येत होतं. पण त्या वेळी ज्येष्ठ नेते कमलनाथ यांना राज्याचं प्रमुखपद दिलं गेलं. ज्योतिरादित्य  प्रदेश काँग्रेसच्या प्रमुखपदीसुद्धा कमलनाथच आहेत. आता हे पद ज्योतिरादित्य यांना देण्यात येऊ शकतं. पण शिंदे यांच्या नावाला कमलनाथ यांचा विरोध असल्याचं कळतं. दरम्यान त्याच वेळी विरोधी पक्षांच्या हालचाली जोरदार सुरू झाल्या आहेत. मध्य प्रदेशात ऑपरेशन लोटसची तयारी सुरू असल्याच्या चर्चा आतापासूनच सुरू झाल्या आहेत. त्यातच शिंदे कँपमधल्या मंत्र्यांच्या अचानक गायब होण्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. वाचा - येस बॅंक घोटाळा : राणा कपूर आणि प्रियंका गांधींचं कनेक्शन असल्याची शक्यता दरम्यान राज्यातल्या परिस्थितीची चर्चा करण्यासाठी कमलनाथ आज दिल्लीत सोनिया गांधी यांना भेटले. या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर तातडीने मुख्यमंत्री कमलनाथ भोपाळला परतले. सरकार सुरक्षित राखण्यासाठीची रणनीती भोपाळमध्ये आखली जाईल, अशी काँग्रेस सूत्रांची माहिती आहे. जसवंत जाटव, मुन्नालाल गोयल, गिरिराज दंतोडिया, ओपीएस भदौरिया या आमदारांसह प्रद्युम्नसिंह तोमर, इमरती देवी आणि तुलसी सिलावट या मंत्र्यांचे फोन बंद आहेत. हे सर्व ज्योतिरादित्य यांचे समर्थक मानले जातात. अन्य बातम्या रुग्णालयातून पळाला 'कोरोना'चा रुग्ण, भीतीनं खासदारांनी स्वत:लाच घरात कोंडलं धक्कादायक! कोट्यवधी लोकांच्या जीवावर उठणार कोरोना, लाखो भारतीयांचा होणार मृत्यू 100 हून अधिक एनकाऊंटर केलेल्या IPS अधिकाऱ्याविरोधात FIR, महिलेने लावले आरोप
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Congress, Jyotiraditya Shinde, Kamal Nath, Madhya pradesh

    पुढील बातम्या