मराठी बातम्या /बातम्या /देश /

झारखंडमधील 'ऑपरेशन लोटस' फेल; कारमध्ये काँग्रेस आमदारांसोबत पैशांचं घबाड, अखेर रवानगी

झारखंडमधील 'ऑपरेशन लोटस' फेल; कारमध्ये काँग्रेस आमदारांसोबत पैशांचं घबाड, अखेर रवानगी

काँग्रेस आमदारांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

काँग्रेस आमदारांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

काँग्रेस आमदारांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jharkhand, India
  • Published by:  Meenal Gangurde

रांची, 31 जुलै : पश्चिम बंगालच्या हावडामध्ये लाखो रुपयांच्या कॅशसह पकडण्यात आलेल्या झारखंडच्या तीन काँग्रेस आमदारांना पार्टीने निलंबित केलं आहे. झारखंडमध्ये काँग्रेस प्रभारी अविनाश पांडेने सांगितलं की, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निर्देशावरुन हे निलंबन करण्यात आलं आहे. यादरम्यान पत्रकार परिषदेत अविनाश पांडे यांनी भाजपवर आरोप केला आहे.

यावेळी ते म्हणाले की, भाजप झारखंडमध्ये सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. आता तर एक मुख्यमंत्री थेट आमदारांशी संपर्क करीत आहे आणि एक केंद्रीय मंत्री ईडीची भीती दाखवून धमकी देत आहे. अविनाश पांडे पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या 8 वर्षांपासून देशात बेरोजदारी आणि महागाई पसरली आहे. लोकशाहीचा विचार केला जात नाही. जनतेने निवडणूक दिलेल्या सरकारला हटवण्याचा प्रयत्न केला जातो. ज्या राज्यात भाजपचं सरकार नाही तेथे ईडी आणि इतर एजन्सींचा दुरुपयोग करून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जातो.

झारखंड सरकार सुरक्षित...

पांडे पुढे म्हणाले की, झारखंड सरकार सुरक्षित आहे. सरकारवर कोणताही धोका नाही आणि सरकार पाच वर्षे पूर्ण करणार.

First published:

Tags: BJP, Jharkhand, काँग्रेस