'पाक'ला हादरविणाऱ्या बालकोटच्या हवाई हल्ल्यांचं हे होतं नाव, पहिल्यांदाच खुलासा

'पाक'ला हादरविणाऱ्या बालकोटच्या हवाई हल्ल्यांचं हे होतं नाव, पहिल्यांदाच खुलासा

इतिहासात माकडांनी युद्धकाळात जे बुद्धिचार्तुर्य दाखवलं त्यावरून नावाची निवड करण्यात आल्याची शक्यता आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 जून : भारताने पाकिस्तान घुसून केलेल्या हवाई हल्ल्याच्या नावाचा आता खुलासा झालाय. पुलवामा इथं दहशतवाद्यांनी 14 फेब्रुवारीला केलेल्या हवाई हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारताने पाकिस्तानातल्या बालाकोट इथल्या जैश ए मोहम्मदच्या तळांवर हवाई हल्ले करून तो तळ उध्वस्त केला. हवाई दलाने या धाडसी हवाई कारवाईला 'ऑपरेशन बंदर' (Operation Bandar) असं नावं दिलं होतं, अशी महिती संरक्षण मंत्रालयाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिलीय.

भारताच्या 'मिराज-2000' या विमानांनी 26 फेब्रुवारीला पहाटे 3.30 वाजता हे हवाई हल्ले केले. हवाई दलांच्या स्क्वॉड्रन 7 आणि 9 मधल्या लढाऊ विमानांनी यात सहभाग घेतला. देशातल्या विविध तळांवरून 'मिराज-2000' या विमानांनी उड्डाण केलं आणि पाकिस्तानातल्या खैबर पख्तुनवा या प्रांतातल्या बालाकोट इथल्या पर्वतांवर असलेला जैश चा प्रशिक्षण तळ उध्वस्त केला. मिराज विमानांनी शक्तिशाली स्पाईस-2000 या बॉम्बचा वापर यासाठी केले गेला. तब्बल 1 हजार किलो बॉम्ब त्यांनी टाकले.

इस्त्रायलने या बॉम्बची निर्मिती केली असून आपल्या लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची त्यांची क्षमता आहे. ही मोहीम अतिशय गुप्तपणे राबविण्यात आली. अशी मोहिम आखताना त्याची माहिती बाहेर जाऊ नये म्हणून प्रत्येक मोहिमेला एक नाव देण्यात येत असतं. भारताने अशा प्रकारचा केलेला हा पहिलाच हवाई हल्ला असल्याचं सांगितलं जातं.

का दिलं बंदर हे नाव?

रामायनात रामाचा सेवक असलेल्या हनुमानाने लंकेत उड्डाण घेऊन रावनाचं अख्ख शहर उद्वस्त केलं होतं. यापासून प्रेरणाघेऊन ऑपरेशन बंदर असं नाव देण्यात आल्याची शक्यताही व्यक्त करण्यात येतेय.

इटालीयन पत्रकाराचा खुलासा

बालाकोट इथे भारतीय सैन्याने केलेल्या एअर स्ट्राइकचे पुरावे मागणाऱ्यांना एका इटालियन पत्रकाराच्या रिपोर्टने एक खुलासा मिळाला आहे. फ्रान्सिस्का मारिनो या इटलीच्या महिला पत्रकाराच्या स्ट्रिंजर एशियामध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, भारताने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये जैश ए मोहम्मदचे दहशतवादी मोठ्या प्रमाणावर मारले गेले आहेत. या पत्रकाराने लिहेलेल्या वृत्तानुसार

अजूनही जैशचे 45 जखमी सदस्य पाकिस्तान लष्कराच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत, असा धक्कादायक गौप्यस्फोट या वृत्तात करण्यात आला आहे.

भारताने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये आमचं काहीच नुकसान झालं नाही, असा पाकिस्तानचा दावा आहे. त्यांनी ते सिद्ध करण्याच्या प्रयत्नात काही विदेशी पत्रकारांना बालाकोटला नेऊन आणलं आणि अगदी काही दिवसांपूर्वी भारतीय पत्रकारांनीही बालाकोटला येऊन खात्री करावी, असंही सांगितलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर एका इटालियन पत्रकाराचा रिपोर्ट प्रसिद्ध झाला आहे. भारताच्या एअर स्ट्राइकमध्ये जैशचे 130 ते 170 सदस्य मारले गेले आहेत, असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

हवाई दलाकडे येणार नवं अस्त्र

भारतीय  हवाईदलाने बालकोटच्या हवाई हल्ल्यात ज्या बॉम्बचा उपयोग केला त्या बॉम्बपेक्षाही अधिक शक्तिशाली असणारे नवे संहारक बॉम्ब भारतीय हवाई दलात दाखल होणार आहेत. बालाकोटवरच्या हल्ल्यात 'स्पाईस-2000' या बॉम्बचा वापर करण्यात आला होता. आता या बॉम्बची पुढची अत्याधुनिक आवृत्ती हवाईदल घेणार आहे.

14 फेब्रुवारीला पुलवामा इथं दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारताने 26 फेब्रुवारीला पाकिस्तानातल्या बालाकोट इथं जैश ए मोहम्मदच्या तळावर हवाई हल्ले करत तो तळ उद्धवस्त केला होता. या कारवाईत 'स्पाईस-2000' या बॉम्बचा वापर करण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 21, 2019 04:08 PM IST

ताज्या बातम्या