Operation All Out : दहशतवाद्यांचं ‘गुप्त’ ठिकाण भारतीय सैन्यानं केलं उद्धवस्त

Operation All Out : दहशतवाद्यांचं ‘गुप्त’ ठिकाण भारतीय सैन्यानं केलं उद्धवस्त

Operation All Out : भारतीय सैन्याचं गुप्त ठिकाण भारतीय सैन्यानं उद्धवस्त केलं आहे.

  • Share this:

श्रीनगर, 10 जून : दहशतवाद्यांविरोधात भारतीय सैन्यानं ऑपरेशन ऑल आऊट आणखी कठोर केलं आहे. आतापर्यंत ऑपरेशन ऑल आऊटच्या माध्यमातून शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. भारतीय जवानांनी सुरू केलेल्या कारवाईनंतर दहशतवाद्यांनी आपली ठिकाणं बदलली. पण, त्यांच्या गुप्त ठिकाणांचा शोध देखील घेण्यास देखील भारतीय सैन्याला यश आलं आहे. किश्तवाडमधील केशवान भागात दहशतवाद्यांनी डोंगर पोखरून बोगदा तयार केला होता. त्यामध्ये ते वास्तव्य करत होते. पण, सैन्याच्या 26 राष्ट्रीय रायफल तुकडी आणि पोलिसांच्या विशेष पथकानं दहशतवाद्यांचं हे ठिकाण देखील उद्धवस्त केलं आहे. सैन्यानं कारवाई करण्यापूर्वी दहशतवाद्यांनी ठिकाणाहून पळ काढला होता. यावेळी सैन्यानं शस्त्रास्त्र आणि खाण्याचं सामान ताब्यात घेतलं आहे.

भारताने पाकिस्तानमध्ये हवाई हल्ले केलेच नाहीत, मोदींनी दिशाभूल केली - शरद पवार

दारूगोळा केला जप्त

भारतीय सैन्याला लष्कर ए तोयबाच्या ठिकाणाबद्दल माहिती मिळाली होती. त्यावरून त्यांनी ही कारवाई केली. सर्च ऑपरेशन करताना एक डोंगर पोखरल्याचं दिसून आलं. कुणालाही याचा पत्ता लागू नये म्हणून झाडं आणि फांद्यांनी त्याला झाकून घेण्यात आलं होतं. पण, भारतीय सैन्यानं ठिकाण उद्धवस्त केलं आहे.

कारवाई दरम्यान रायफलची मॅक्झिन, खाण्याचं सामान, तांदूळ, गव्हाचं पीठ, कपडे, औषधं, सिलिंडर, मॅगी असं सामान जप्त करण्यात आलं. सैन्याच्या कारवाईपूर्वी दहशतवाद्यांनी त्या ठिकाणावरून पळ काढला होता.

पाकिस्तानी महिलेनं विमानात टॉयलेट समजून उघडलं Emergency Exitचं दार

ऑपरेशन ऑल आऊट

मागील काही दिवसांपासून जम्मू - काश्मीरमध्ये ऑपरेशन ऑल आऊट सुरू करण्यात आलं आहे. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सरकारनं देखील सैन्याला पूर्ण मुभा दिली आहे. शिवाय, कारवाई करताना सुरक्षेसाठी काही मार्गदर्शक तत्व देखील आखून दिली आहेत.

VIDEO विधानसभा निवडणुकीची तयारी आजपासून सुरू - मुख्यमंत्री

First published: June 10, 2019, 9:02 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading