पालघर,ता.15 एप्रिल: ज्या ठिकाणी राममंदिर होतं, त्याच ठिकाणी राम मंदिर उभारलं गेलं पाहिजे, त्यासाठी संघर्ष करावा लागला तरी चालेल असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय. पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यात आयोजित विराट हिंदू संमेलनात ते बोलत होते. तसंच ज्यांची स्वार्थाची दुकानं बंद होतात ते लोकांमध्ये भांडणं लावतात असा सूचक टोलाही मोहन भागवत यांनी लगावलाय.
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात विश्व हिंदू परिषदेच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या जनजाती विद्यार्थी वसतिगह प्रकल्पाचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाच्या निमित्तानं हिंदू संमेलन आयोजित करण्यात आलं होतं.
आमचा भारत एक, आम्हाला जात आणि धर्म माहित नसल्याचंही भागवतांनी स्पष्ट केलं. या देशात राहणारे सर्व हिंदूच आहेत. वचिंतांची सेवा करणं हे आपलं कर्तव्यच असून त्यात उपकाराची भावना नको
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा