दिवाळीपर्यंत केवळ 60% उड्डाणे शक्य; Air India ला विकावंच लागेल; केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती

दिवाळीपर्यंत केवळ 60% उड्डाणे शक्य; Air India ला विकावंच लागेल; केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती

आज केंद्रीय उड्डाण मंत्री यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती दिली

  • Share this:

नवी दिल्ली, 16 जुलै : नागरी उड्डाणमंत्री हरदीप सिंह पुरी यांनी गुरुवारी सांगितले की कोरोना संकटापूर्वी जितक्या देशांतर्गत उड्डाणे होत होती त्याच्या 55 ते 60 टक्क्यांपर्यंत उड्डाणे दिवाळीपर्यंत सुरू होईल. केंद्रीय मंत्र्यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

हरदीप सिंह पुरी यांनी सांगितले की वंदे भारत मिशतअंतर्गत आतापर्यंत 2 लाख 80 हजार लोकांना परदेशातून मायभूमीत आणण्यात आलं आहे. त्यांनी सांगितले की दुबई आणि युएईमधून मोठ्या संख्येने भारतील देशात परतले आहे. तर अमेरिकेतून तब्बल 30 हजार लोक परतले आहेत.

हे वाचा-मोठी बातमी! देशात पहिल्यांदा COVAXIN चं ह्युमन ट्रायल; तरुणाला दिला पहिला डोस

वंदे भारत मिशनअंतर्गच भारतीय मायदेशी परतले

त्यांनी सांगितले वंदे भारत मिशनअंतर्गत एअर फ्रान्स एअरलाइन 18 जुलैपासून 1 ऑगस्टदरम्यान दिल्ली, मुंबई आणि बंगळुरुपासून पॅरिससाठी 28 उड्डाने संचालन केली जाणार आहे. जेव्हा अमेरिका एअरलाइन्सची 18 उड्डाणे 17 ते 31 जुलैदरम्यान भारतात येणार आहे. त्यांनी सांगितले की याव्यतिरिक्त जर्मनीसोबतही चर्चा सुरू आहे. आज तकने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

पुढे ते म्हणाले की एअर इंडियाचे खासगीकरण जरुरी आहे. आणि सरकार या दिशेला काम करीत आहे. मंत्र्यांनी सांगितले की विना पगारी कर्मचाऱ्यांना सक्तीची रजा दिली जात आहे. सरकार एअरलाइन्स कंरन्यांना मोठी आर्थिक मदत करू शकत नाही. कोरोना संकटामुळे एअरलाइन्सला मोठं नुकसान होत आहे. खर्च कमी करण्यासाठी अनेक पाऊले उचलली जात आहे. ज्यामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली जात आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: July 16, 2020, 7:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading