आजपासून हॉटेलिंग स्वस्त,बिलावर फक्त 5 टक्केच जीएसटी

आजपासून हॉटेलिंग स्वस्त,बिलावर फक्त 5 टक्केच जीएसटी

आजपासून हॉटेलमध्ये फक्त 5 टक्के जीएसटी आकारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी ही माहिती दिली आहे.

  • Share this:

15 नोव्हेंबर : खवय्येगिरी करणाऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी. आजपासून हॉटेलिंग स्वस्त होणारेय.आजपासून हॉटेलमध्ये फक्त 5 टक्के जीएसटी आकारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी ही माहिती दिली आहे.

हॉटेल मालक किंवा विक्रेते व्हॅट कमी न करता वर जीएसटी लावत होते. यामुळे ग्राहकांची फसवणूक सुरु होती. मात्र, आजपासून हॉटेलमधील दर पत्रकात बदल करणं आवश्यक असेल. जे हॉटेल मालक दर कमी करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही बापट यांनी दिलाय.यासाठी सरकारने हेल्पलाईन नंबर 1800225900 सुरू करणार आहे. अशी माहिती बापट यांनी दिली.

या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुरुवातीला हॉटेलिंगवर तब्बल 18 टक्के जीएसटी आकारण्यात आला होता. याबाबत बरीच नाराजी व्यक्त करण्यात येत होती. तसंच चॉकलेट्ससारख्या ज्या वस्तूंवरचा जीएसटी कमी झालाय त्या वस्तूंचे दर उत्पादकांनी कमी करावेत असं आवाहनही त्यांनी केलंय.

First published: November 15, 2017, 9:19 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading