• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • Monsoon Session: संसदेत फक्त 18 तास झालं कामकाज, खोळंब्यामुळे जनतेचे 133 कोटी रुपये वाया

Monsoon Session: संसदेत फक्त 18 तास झालं कामकाज, खोळंब्यामुळे जनतेचे 133 कोटी रुपये वाया

Monsoon Session: 19 जुलैपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात मिळून केवळ 18 तास कामकाज झालं आहे. संसदेतील कामकाज ठप्प झाल्यानं देशाच्या तिजोरीला 133 कोटी रुपयांपेक्षा जास्तीचं नुकसान झालं आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 01 ऑगस्ट: 19 जुलैपासून संसदेत पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session) सुरुवात झाली होती. पावसाळी अधिवेशनात महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल आणि अनेक विधेयकेही पास होतील, अशी आशा केंद्र सरकारला (Central Government) होती. पण पेगासस (Pegasus) हेरगिरी आणि अन्य मुद्यांवरून विरोधकांनी केंद्र सरकारची पुरती कोंडी केली होती. त्यामुळे संसदेचं कामकाज (Parliament Work) अनेकवेळा ठप्प (Stopped) करण्यात आलं. 19 जुलैपासून आतापर्यंत दोन्ही सभागृहात मिळून केवळ 18 तास कामकाज झालं आहे. संसदेतील कामकाज जवळपास 107 तास चालणं अपेक्षित होतं, पण तसं झालं नाही. परिणामी संसदेतील कामकाज ठप्प झाल्यानं देशाच्या तिजोरीला 133 कोटी रुपयांपेक्षा जास्तीचं नुकसान झालं आहे. 19 जुलैपासून आतापर्यंत लोकसभेच्या चालू अधिवेशनात केवळ 7 तास कामकाज झालं आहे. लोकसभेत आतापर्यंत 54 तास काम करता आलं असतं. हेही वाचा-मोदी सरकारने जाहीर केली Corona Hotspot ठरणारी 10 राज्य! महाराष्ट्राचाही समावेश दुसरीकडे, वरिष्ठ सभागृहात म्हणजेच राज्यसभेतही हीच स्थिती पाहायला मिळाली आहे. याठिकाणीही केवळ 11 तास काम केलं गेलं आहे. तर इथेही सुमारे 53 तास काम केलं जाऊ शकत होतं. म्हणजेच दोन्ही सभागृहात वाया गेलेल्या तासांचा एकत्रित हिशोब लावला असता, एकूण 89 तास वाया गेले आहेत. दरम्यान, जनतेच्या 133 कोटी रुपयांहून अधिक पैसे या गदारोळामुळे वाया गेल्याचा अंदाज सूत्रांकडून व्यक्त केला गेला आहे. हेही वाचा-देशात बेरोजगारीचं संकट; पदवीधरांची नोकरीसाठी वणवण, डिप्लोमावाल्यांचेही वाईट हाल नवीन मंत्र्यांचा परिचयही करू शकले नाहीत पंतप्रधान पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी संसदेत केलेल्या गदारोळामुळे पंतप्रधानांना संसदेत आपल्या नवीन मंत्र्यांचा परिचयही करून देता आला नाही. कामकाज तहकूब होईपर्यंत संसदेत गोंधळ सुरूच होता. भारतीय पत्रकार आणि काही राजकीय नेत्यांवर पेगाससद्वारे हेरगिरी केल्याच्या आरोपातून विरोधकांनी सरकारला खिंडित गाठलं होतं. तसेच ऑक्सिजनमुळे देशात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचा दावा केंद्र सरकारकडून करण्यात आला होता. यामुळेही विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती. पण संसदेत कामकाज सुरळीत न झाल्यानं जनतेचे जवळपास 133 कोटी रुपये वाया गेले आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: