मराठी बातम्या /बातम्या /देश /सावधान! ऑनलाइन पिझ्झा ऑर्डर करणं पडलं 4 लाखांना; डॉक्टर महिलेची हातोहात फसवणूक

सावधान! ऑनलाइन पिझ्झा ऑर्डर करणं पडलं 4 लाखांना; डॉक्टर महिलेची हातोहात फसवणूक

ऑनलाइन व्यवहार करताना सावध राहा, असं वारंवार सांगितलं जात असलं, तर हॅकर्स आपल्यापेक्षा अधिक स्मार्ट झाले आहेत. एवढीशी चूक किंवा दुर्लक्ष आपल्याला किती महागात पडू शकतं हे या उच्चशिक्षित महिलेच्या अनुभवावरून लक्षात येईल.

ऑनलाइन व्यवहार करताना सावध राहा, असं वारंवार सांगितलं जात असलं, तर हॅकर्स आपल्यापेक्षा अधिक स्मार्ट झाले आहेत. एवढीशी चूक किंवा दुर्लक्ष आपल्याला किती महागात पडू शकतं हे या उच्चशिक्षित महिलेच्या अनुभवावरून लक्षात येईल.

ऑनलाइन व्यवहार करताना सावध राहा, असं वारंवार सांगितलं जात असलं, तर हॅकर्स आपल्यापेक्षा अधिक स्मार्ट झाले आहेत. एवढीशी चूक किंवा दुर्लक्ष आपल्याला किती महागात पडू शकतं हे या उच्चशिक्षित महिलेच्या अनुभवावरून लक्षात येईल.

नवी दिल्ली, 2 मार्च: ऑनलाइन व्यवहार करताना सावध राहा, असं वारंवार सांगितलं जात असलं, तर हॅकर्स आपल्यापेक्षा अधिक स्मार्ट झाले आहेत. कुठलीही साधीशी चूक, दुर्लक्ष किंवा गृहित धरणं आपल्याला किती महागात पडू शकतं हे या उच्चशिक्षित महिलेच्या अनुभवावरून लक्षात येईल. पिझ्झा ऑर्डर करताना तिची हातोहात कशी फसवणूक झाली वाचा.

सध्याचा काळ हा आधुनिक आणि तंत्रज्ञानाचा काळ म्हणून ओळखला जातो. वाढत्या तंत्रज्ञानाचे जितके फायदे आहेत तितकेच त्याचे दुष्परिणाम सुद्धा समोर येत आहेत. आजकाल सर्वच व्यवहार हे ऑनलाईन स्वरुपात होऊ लागले आहेत. मग खाद्यपदार्थांची ऑर्डर असो, कोणत्याही गोष्टीचे बुकिंग असो, बिल भरणे असो किंवा इतर काही आर्थिक कामे. ऑनलाईन माध्यामतून ही कामे पटकन तर होतातच. शिवाय याने शारीरक त्रासही कमी होतो. त्यामुळे अलीकडे बऱ्यापैकी सर्वच लोक ऑनलाईन व्यवहारांच्या मागे धावत आहेत. मात्र ऑनलाईन ऑर्डर करणे एका डॉक्टर महिलेला चांगलंच अंगलट आलं आहे. एका महिलेला ऑनलाईन ऑर्डरद्वारे तब्बल 4 लाखांचा गंडा बसला आहे. दिल्लीच्या AIIMS रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत असलेल्या या महिलेने पिझ्झा मागवायचं निमित्त पुरलं. नवभारत टाइम्सने याविषयी बातमी दिली आहे.

या महिलेने एका विदेशी वेबसाईटवरून ऑनलाइन पिझ्झा मागविला होता. आणि त्यादरम्यान तिच्या अकाऊंटमधील 4 लाख रुपये लंपास झाल्याचे तिला समजले.

या डॉक्टर महिलेने एका विदेशी वेबसाईटवरून पिझ्झा ऑर्डर केला होता. मात्र त्यावेळी तिला बिल भरण्यासाठी काही तांत्रिक अडचण येत होती. त्यांनतर तिने गुगलवर जाऊन त्याठिकाणी असलेलं मार्केट शोधून काढलं. त्याद्वारे तिला एक नंबर देण्यात आला होता. त्या मिळालेल्या नंबरवर महिलेने फोन केला असता. फोन वर एक व्यक्ती बोलत होती. त्या व्यक्तीने महिलेला सांगितलं, की काही वेळाने तुम्हाला एक फोन येईल त्यावर तुम्ही तुमची समस्या सांगा.  त्यांनतर जो फोन आला त्या व्यक्तीने महिलेला एक लिंक पाठवत असल्याचं सांगितलं. आणि त्यावरून त्या महिलेला पिझ्झाची ऑर्डर देण्यास सांगितलं.

(हे पाहा: हसऱ्या आयशाच्या आत्महत्येमुळे सारा देश हादरला, पोलिसांनी आवळल्या पतीच्या मुसक्या)

आलेल्या लिंकवर महिलेने आपल्या बँकेसंबंधी खाजगी माहिती त्या लिंकवर भरली, आणि नेमकी इथेच तिची फसवणूक झाली.  यानंतर त्या महिलेला फोनवर काही संदेश आले. आणि ते पाहताच त्या महिलेला धक्काच बसला. कारण या पिझ्झा ऑर्डरमुळे तिच्या खात्यातले 4 लाख रुपये गायब झाले होते. त्त्यानंतर महिलेने त्वरित दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

First published:

Tags: Cyber crime, Delhi, Delhi News