नवीन वर्षांत सुद्धा कांदा रडवणार, जाणून घ्या किती आहे सध्याचा भाव

नवीन वर्षांत सुद्धा कांदा रडवणार, जाणून घ्या किती आहे सध्याचा भाव

सोमवारी कांद्याच्या किंमती लासलगाव घाऊक बाजारात सरासरी 1,951 रुपये प्रति क्विंटल होत्या, त्यानंतर बाजारात कांद्याचा दर सतत वाढता आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 31 डिसेंबर : केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील बंदी हटवण्याचा निर्णय घेतला आहे. ही बंदी 1 जानेवारी 2021 पासून हटवली जाणार आहे. यानंतर कांद्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं चित्र आहे. नाशिकच्या लासलगाव घाऊक बाजारात कांद्याच्या किंमती केवळ दोन दिवसांत 28 टक्क्यांनी वाढून जवळपास 2500 रुपये प्रति क्विंटलवर पोहचल्या आहेत.

मंगळवारी कांद्याच्या किंमती सरासरी 2,400 रुपये प्रति क्विंटल होत्या. तर बुधवारी हा भाव वाढून 2,500 रुपये क्विंटल झाला. गेल्या दोन दिवसांत किंमतींमध्ये जवळपास 28 टक्के वाढ झाली.

परदेशी व्यापार महानिदेशालयाने एका अधिसूचनेमध्ये सांगितलं की, सर्व कांद्यावरील निर्यात 1 जानेवारी 2021 पासून प्रतिबंधमुक्त करण्यात येत आहे. कांद्याच्या किंमती 42 टक्के वाढल्या. लासलगाव एपीएमसीचे सचिव नरेंद्र यांनी सांगितलं की, सोमवारी कांद्याच्या किंमती लासलगाव घाऊक बाजारात सरासरी 1,951 रुपये प्रति क्विंटल होत्या, त्यानंतर बाजारात कांद्याचा दर सतत वाढता आहे.

देशाच्या राजधानीमध्ये कांद्याच्या किरकोळ किंमतीमध्ये 25 ते 42 टक्के वाढ पाहायला मिळाली. सोमवारी कांद्याचा भाव 35 ते 40 रुपये प्रति किलो होता, बुधवारी वाढून 50 रुपये प्रति किलो झाला आहे. सप्टेंबरमध्ये सरकारने वाढत्या किंमती आणि देशांतर्गत बाजारपेठेत उपलब्धता वाढवण्यासाठी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती.

महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक ही देशातील तीन प्रमुख कांदा उत्पादक राज्य आहेत. भारत सर्वात मोठ्या कांदा उत्पादक देशांपैकी एक आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: December 31, 2020, 6:20 PM IST
Tags: onion

ताज्या बातम्या