काय सांगता फक्त 35 रुपये किलो कांदा? 'या' शहरात खरेदीआधी दाखवावा लागतो ID

काय सांगता फक्त 35 रुपये किलो कांदा? 'या' शहरात खरेदीआधी दाखवावा लागतो ID

सध्या 80 ते 90 रुपये किलो कांदा आहे. त्यामुळे लोकांच्या डोळ्यात या किंमती वाचूनच पाणी येत आहे. अशा परिस्थितीत एक राज्य असे आहे जे 35 रुपये किलो दराने कांदा विकत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. सध्या 80 ते 90 रुपये किलो कांदा आहे. त्यामुळे लोकांच्या डोळ्यात या किंमती वाचूनच पाणी येत आहे. अशा परिस्थितीत एक राज्य असे आहे जे 35 रुपये किलो दराने कांदा विकत आहे. मात्र या दराने कांदे खरेदी करण्यासाठी तुम्हाला दुकानदाराला ओळखपत्र दाखवावे लागेल. याचबरोबर, एका व्यक्तीला फक्त 2 किलो कांदे दिली जात आहेत. हे राज्य आहे तेलंगणा. तेलंगणा राज्यातील सरकार सर्वसामान्यांना या खास मार्गाने स्वस्त कांदे देत आहे.

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, तेलंगणामध्ये सरकारने स्वस्त दरात चालवल्या जाणाऱ्या रायतू मार्केटमध्ये 35 रुपये दरानं कांदा मिळत आहे. रायतू बाजारात छोटे शेतकरी भाजीपाला थेट ग्राहकांना विकू शकतात. तेलंगणा सरकारने शनिवारी शेतकरी बाजारातून कांदा 35 रुपये दराने विक्री करण्याचा निर्णय घेतला.

वाचा-महत्त्वाची बातमी! गाडीमध्ये 'हे' सर्टिफिकेट नसेल तर भरावा लागले 10 हजारांचा दंड

75-100 रुपये दरानं मिळत आहे कांदा

देशभरातील बाजारात कांद्याचे दर झपाट्याने वाढले आहेत. बऱ्याच ठिकाणी कांद्यानं शंभरी गाठली आहे. तर बऱ्याच बाजारात कांदा 75 रुपयांना विकला जात आहे.

21 रुपये किलो दरानं कांदा पाठवणार नाफेड

नाफेडचे संचालक अशोक ठाकूर यांनी न्यूज 18 इंडियाशी खास बातचित केली. यावेळी त्यांनी दा लवकरच 21 रुपये किलो दराने राज्यांना पाठविला जाईल. यानंतर वाहतूक आणि इतर खर्चाची भर घालून राज्यांना ती कांदा बाजारात स्वत: च्या किंमतीनुसार विक्री करता येईल. त्याचबरोबर दिल्लीत कांदा 28 रुपये प्रति किलो दराने विकला जात असल्याचे त्यांनी सांगितले. तज्ज्ञांच्या मते, नाफेडकडून 21 रुपये कांदा मिळाल्यानंतर, राज्य आपल्या खर्चाची भर घालून जास्तीत जास्त 30 रुपये प्रति किलो दराने कांदा आरामात विकू शकेल.

वाचा-बाजारात लवकरच 30 रुपये किलोने विकला जाईल कांदा; सरकारने सांगितला प्लान

25 हजार टन कांदा साठा शिल्लक आहे

केंद्र सरकारकडे आता कांदा बफर स्टॉकमध्ये केवळ 25 हजार टन कांदा शिल्लक आहे जो नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात संपेल. नाफेडचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार चड्ढा यांनी शुक्रवारी याबाबत माहिती दिली आहे. सध्या देशांतर्गत उपलब्धता वाढवण्यासाठी आणि कांद्याचे दर कमी करण्यासाठी नाफेड कांद्याचा बफर स्टॉक उतरवत आहे. गेल्या काही आठवड्यात कांद्याचे दर प्रति किलो 75 रुपयांवर गेले आहेत.

Published by: Priyanka Gawde
First published: October 25, 2020, 12:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading