कांद्याच्या दरानं आता शंभरी पार केलीय. कांद्याच्या वाढत्या किंमतीनं सर्वसामान्य त्रस्त झाले असताना आता केंद्र सरकारकडूनही याची गंभीर दखल घेतली जातेय. याच दरवाढीच्या मुद्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या नेतृत्वात मंत्री गटाची एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आलीय. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, रामविलास पासवान, कृषीमंत्री आणि पंतप्रधान कार्यालयाचे अधिकारी या बैठकीत सहभागी होणार आहेत. कांद्याचे दर नियंत्रित करण्यासाठी या बैठकीत त्वरित पावलं उचलण्यावर चर्चा होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Onion