मराठी बातम्या /बातम्या /देश /

कमाल! कांदा सडत होता, 21 वर्षांच्या शेतकऱ्यानं स्वतःच तयार केलं घरगुती कोल्ड स्टोरेज; कमावले 96 लाख

कमाल! कांदा सडत होता, 21 वर्षांच्या शेतकऱ्यानं स्वतःच तयार केलं घरगुती कोल्ड स्टोरेज; कमावले 96 लाख

कांद्याची साठवणूक करण्यासाठी कोल्ड स्टोरेजमध्ये भाड्याने माल ठेवावा लागतो. हे शेतकऱ्याला परवडणारे नसतं. यावर या तरुण शेतकऱ्याने काय जुगाड उपाय शोधलाय पाहा..

कांद्याची साठवणूक करण्यासाठी कोल्ड स्टोरेजमध्ये भाड्याने माल ठेवावा लागतो. हे शेतकऱ्याला परवडणारे नसतं. यावर या तरुण शेतकऱ्याने काय जुगाड उपाय शोधलाय पाहा..

कांद्याची साठवणूक करण्यासाठी कोल्ड स्टोरेजमध्ये भाड्याने माल ठेवावा लागतो. हे शेतकऱ्याला परवडणारे नसतं. यावर या तरुण शेतकऱ्याने काय जुगाड उपाय शोधलाय पाहा..

झाबुआ (मध्य प्रदेश), 15 जुलै: भारत देश हा शेतीप्रधान देश आहे. देश कितीही प्रगत झाला असला तरी देशातील 60 टक्के लोक आजही शेतीतून मिळणाऱ्या रोजगारावर अवलंबून आहेत. शेती हा व्यवसाय संपूर्णपणे नैसर्गिक ऋतुचक्रांवर आधारित आहे. यामध्ये झालेल्या थोड्याफार बदलाचाही शेती व्यवसायावर मोठा परिणाम होतो. बटाटे (Potatoes) आणि कांद्यांची (Onions) शेती याचे एक उदाहरण आहे. कांदा हे पीक मार्च एप्रिलमध्ये काढणीला येतं त्यामुळे त्या काळात विकलं तर शेतकऱ्याला किलोमागे 2 ते 3 रुपयांचा नफा मिळतो. पण हत्यामुळे तो 2-3 रुपयांच्या नफ्यानेच माल विकून टाकतो. तेच जर त्याने माल साठवून ठेवला तर त्याला त्याच मालाला पावसाळ्यात दर किलोला 35 रुपयांपर्यंत नफा मिळतो. शेतीतील अडते हेच करतात माल साठवून ठेवतात आणि नंतर बक्कळ कमाई करतात. पण यावरच मध्य प्रदेशमधील 21 वर्षांच्या युवकाने तोडगा काढलेला आहे. मध्य प्रदेशमधील झाबुआ (Jhabua) गावात राहणाऱ्या 21 वर्षांच्या रोहित पटेल (Rohit Patel) या युवकाने कांदा साठवणुकीसाठी एक उत्तम तोडगा काढलेला आहे. रोहितच्या या युक्तीमुळे थोडा खर्च करून शेतकऱ्याला त्याचा कांदा साठवणं शक्य होणार आहे. त्यामुळे त्याला अधिक नफा होऊ शकतो. द बेटर इंडिया या हिंदी वेबसाइटने एक व्हिडिओ शेअर करत रोहित पटेलने केलेल्या तोडग्याबाबतची माहिती दिलेली आहे. या व्हिडिओमध्ये दाखवले आहे की रोहितने उन्हाळ्यात तयार झालेल्या कांद्यांची कोल्ड स्टोरेजशिवाय कशाप्रकारे साठवणूक (Stored) केलेली आहे. त्याने खिडकी नसलेल्या एका खोलीत जमीनीपासून 8 इंचावर वीटा रचून त्यावर लोखंडाची जाळी बसवली. व त्या जाळीच्या वर कांद्यांची साठवणूक केली आहे. त्या लोखंडाच्या जाळीवर एक एक्झॉस्ट फॅन (Exhaust fan) लावून कांद्यांना खालून हवा लागण्याची सोयही केलेली आहे. ज्यामुळे कांदे सडणार नाहीत आणि काही महिन्यांपर्यंत टिकतील. घराचे खोदकाम करताना सापडला नाण्यांनी भरलेला हंडा, गावात एकच चर्चा आणि... या व्हिडिओमुळे शेतकऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय प्राप्त झालेला आहे. कांद्याची शेती असलेले शेतकरी या पर्यायाचा वापर करून काही महिन्यांपर्यांत कांदे साठवून ठेवू शकतात आणि त्यातून भरपूर प्रमाणात नफा कमवू शकतात. अशाच युक्त्या अनेक शेतकरी योजत असतात. त्या अनेकांपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. म्हणजे इतर शेतकरीही त्याचा फायदा घेऊ शकतील.
First published:

Tags: Agriculture, Farmer, Madhya pradesh, Onion, Success story

पुढील बातम्या