'ओनिडा-ओनर्स प्राइड'ची होतेय विक्री

'ओनिडा-ओनर्स प्राइड'ची होतेय विक्री

टीव्ही आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं बनवणाऱ्या मर्क इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे चेअरमन गुलू मीरचंदानी म्हणाले की, 'मला जर चांगला नफा होणार असेल तर मी हा व्यवसाय विकायला तयार आहे.'

  • Share this:

23 नोव्हेंबर : 'ओनिडा - ओनर्स प्राइड' अशी जाहिरात आणि त्यातला तो शिंग असणारा राक्षस आपल्या सगळ्यांच्याच लक्षात आहे. याच ओनिडा टीव्हीने भारतात अनेक वर्ष राज्य केलं. पण आता हीच ओनिडा कंपनी विकण्यात येणार आहे. टीव्ही आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं बनवणाऱ्या मर्क इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे चेअरमन गुलू मीरचंदानी म्हणाले की, 'मला जर चांगला नफा होणार असेल तर मी हा व्यवसाय विकायला तयार आहे.' मर्क इलेक्ट्रॉनिक्समध्ये मीरचंदानी आणि मनसुखानी कुटुंबाच्या प्रमोटर्सची 57.71 टक्के हिस्सेदारी आहे. ओनिडानं टीव्ही बनवण्याचं सात वर्षांपूर्वीच बंद केलं होतं.

'अशा' बदलल्या ओनिडाच्या टॅगलाइन

- सन 1983पासून ते 1997 पर्यंत 'नेबर्स एनवी-ओनर्स प्राइड' या टॅगलाइनने ओनिडा आपल्यासमोर आला.

- सन 1997 ते 2009पर्यंत 'नथिंग बट ट्रूथ' अशी टॅगलाइन आली.

- सन 2009 ते 2011पर्यंत 'डिझाइन विद यू इन माइंड' अशी टॅगलाइन आली. पण या जाहिरातीत तो शिंग असणार राक्षस नव्हता.

- सन 2011 ते 2013पर्यंत कोणतीच नवीन टॅगलाइन त्यांनी वापरली नाही. पण 2013पासून ते आतापर्यंत 'ओनर्स प्राइड' या टॅगलाइनसोबत ओनिडा जाहिराती करत आहे.

ओनिडा का विकतायत?

मीरचंदानी यांच्या म्हणण्यानुसार कंपनीच्या प्रमोटर्सना कंपनीचा फायदा झाल्यानंतर विकण्याची इच्छा नाही, पण जर प्राइवेट इक्विटी फंडानुसार विकत घेणाऱ्याने 5-6 वेळा जर कंपनीचं व्हॅल्युएशन केलं तर कंपनी विकण्याचा विचार केला जाऊ शकतो.

2010मध्ये कलर टीव्ही आणि डीव्हीडीचा व्यवसाय 1500 कोटींवर होता, पण पिच्छर ट्युबची उपलब्धता कमी झाल्यानंतर त्यांच्या व्यवसायात अडचणी येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे कंपनीच्या प्रमोटर्सने तिला विकण्याचा निर्णय घेतला आहे. 2016-17 मध्ये कंपनीचं एकूण उत्पन्न 747.59 कोटी रुपये इतकं होतं. याच दरम्यान कंपनीला 5.68 कोटींच नुकसानही झालं. पण गेल्या तीन महिन्यामध्ये कंपनी फायद्यात आहे. त्यामुळे आता या कंपनीची विक्री होणार की नाही हेच बघणं महत्त्वाचं आहे.

First published: November 23, 2017, 5:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading