नोटबंदीला एक वर्ष पूर्ण; विरोधक करणार देशभरात निषेध

नोटबंदीला एक वर्ष पूर्ण; विरोधक करणार देशभरात निषेध

विरोधकांसाठी हा हुकमाचा एक्काच म्हणायला हवा. त्यामुळेच आज देशभर विरोधक रस्त्यावर उतरणार आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी अनेक शहरांमध्ये निदर्शनं करणार आहे.

  • Share this:

08 नोव्हेंबर: नोटबंदीला आज एक वर्ष पूर्ण होतंय. मोदींच्या घोषणेनंतरचा धक्का, नोटा खपवण्याची आणि बदलण्याची लगबग. दुकानांच्या कॅश काऊंटरवर होणारे वाद सगळंच आठवतं. विरोधकांसाठी हा हुकमाचा एक्काच म्हणायला हवा. त्यामुळेच आज देशभर विरोधक रस्त्यावर उतरणार आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी अनेक शहरांमध्ये निदर्शनं करणार आहे.

सुप्रिया सुळे आणि अजित पवार स्वतः रस्त्यावर उतरणार आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक अशा अनेक मोठ्या शहरांमध्ये नोटबंदी विरोधातली निदर्शनं आज पहायला मिळतील. वाशिम , नागपूर . पुणे , औरंगाबाद , नांदेड , पालघर , मुंबई , नाशिकला आंदोलनं होणार आहे. नवी दिल्लीत मध्यरात्री युवा काँग्रेसनं रिझर्व बँकेच्या कार्यालयाबाहेर निदर्शनं केली. काळ्या पैशामुळे अर्थव्यवस्थेला जबर फटका बसला आहे. लोकांची कष्टाची कमाईही त्यांना काढता येईना, वापरता येईना असं या तरूण कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

दरम्यान, नोटबंदीच्या पूर्वसंध्येला पुण्यात नोटबंदीला विरोध असलेल्या विध संघटना, राजकीय पक्ष, समविचारी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी निषेध मोर्चा काढला. एस एम जोशी सभागृहात नोटबंदी - दावे आणि कावे या विषयावर सभा घेण्यात आली आणि नंतर एस एम जोशी फाऊंडेशन ते अलका चौक असा मोर्चा काढण्यात आला.

नोटबंदी म्हणजे संघटित लूटच असं विधान काल माजी पंतप्रधान मनमोहनसिंह यांनी केलं आहे. यावेळी नोटबंदीचा निर्णय पूर्ण फसला असून घातक ठरला तरीही भाजप काळा पैसा विरोधी दिन साजरा करतंय याचा निषेध करत टीका करण्यात आली.नोटाबंदी ही एक शोकांतिका आहे असंही राहुल गांधी यांनी ट्विट केलंय.

First published: November 8, 2017, 10:05 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading