कोलकाता, 14 जून : पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांना झालेल्या मारहाण प्रकरणाची दखल आता कोलकाता उच्च न्यायालयानं घेतली आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमधील 126 डॉक्टर्सनी आपला राजीनामा दिला आहे. संपावर असलेल्या डॉक्टरांसोबत बोलणी करा आणि प्रकरण मिटवा असे आदेश कोलकाता उच्च न्यायालयानं ममता बॅनर्जी सरकारला दिले आहेत. डॉक्टरांनी घेतलेल्या पवित्र्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल झाले आहेत. रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचं चित्र दिसून येत आहे. पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांनी काम बंद आंदोलनाची हाक दिली. त्याला आता महाराष्ट्र, दिल्ली, मध्य प्रदेश या राज्यांमधून देखील साथ मिळत आहे. देशभरात डॉक्टरांनी घेतलेल्या पवित्र्यामुळे AIIMS सारख्या रूग्णालयांमध्ये देखील रुग्णांची गर्दी झाल्याचं पाहायाला मिळत आहे.
ममतांचा भाजपवर आरोप
दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे. डॉक्टरांच्या आंदोलनाला भाजपची फूस असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. पश्चिम बंगालमधील डॉक्टरांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची देखील भेट घेण्याचा निर्णय घेतला.
मारहाणीचा निषेध; डॉक्टरांनी हेल्मेट घालून केली रुग्णांची तपासणी
मुंबईतून देखील पाठिंबा
मुंबईतील डॉक्टरांनी देखील पश्चिम बंगालमधील डॉक्टारांना पाठिंबा देत मारहाणीचा निषेध केला आहे. तर, दिल्लीतील AIIMSमधील डॉक्टरांनी हेल्मेट घालून रूग्णांची तपासणी केली. त्यांनी अनोख्या पद्धतीनं या मारहाणीचा निषेध केला.
बॅलेट पेपरवर निवडणुकीसाठी याचिका; तात्काळ सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार
ममतांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष
दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या इशाऱ्याकडे डॉक्टरांनी दुर्लक्ष केलं आहे. ममता बॅनर्जी यांनी चार तासामध्ये उपोषण संपवण्याचा अल्टिमेटम दिला होता. तर, डॉक्टरांनी ममता बॅनर्जींवर धमकी दिल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे डॉक्टर विरूद्ध राज्य सरकार हा वाद पेटताना दिसत आहे.
VIDEO: नाशिकमध्ये भरदिवसा गोळीबार करून सशस्त्र दरोडा