कोरोनाच्या लढ्यात विप्रो ग्रुपकडून 1125 कोटींचे साहाय्य, अझीम प्रेमजी फाऊंडेशनचे योद्धे मदतीसाठी रणांगणात

अझीम प्रेमजींच्या विप्रो ग्रुपकडून दिलेला निधी पीएम केअर्सला न देता फाऊंडेशनच्या माध्यमातून घरोघरी जाऊन गरजुंना मदत केली जाणार आहे

  • Share this:

बंगळुरु, 1 एप्रिल : कोरोनाच्या (Coronavirus) लढ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) अपील केल्यानंतर उद्योगजगतातील अनेक जण समोर आले आहेत व त्यांनी सढळ हाताने मदत केली आहे. यामुळे पीएम केअर्समध्ये (PN Cares) हजारो कोटी रुपये जमा झाले आहेत.

यादरम्यान अझीम प्रेमजी (Azim Premji) यांच्या विप्रो समूहाने (Wipro Group) कोरोनाची दोन करण्यासाठी 1125 कोटी रुपये खर्च करणार असल्याचे जाहीर केलं आहे. मात्र समूह ही रक्कम पीएम केअर्स फंडमध्ये दान न करता अझीम प्रेमजी फाऊंडेशनच्याद्वारे ही मदत केली जाणार आहे.

संबंधित - कोरोनाच्या लढ्यात डॉ. प्रकाश आमटे सरसावले, योद्ध्यांसाठी मास्कची निर्मिती

काय सांगितलं कंपनीने..

विप्रो समूहाने बुधवारी एक स्टेटमेंट जारी केलं त्यानुसार, कोविड – 19 (Covid - 19) मुळे उद्भवलेल्या संकटात विप्रो लिमिटेड, विप्रो एंटरप्रायजेज आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशन मिळून 1125 कोटी रुपये खर्च करणार आहोत. ही रक्कम कोरोना प्रभावित भागात नागरिकांच्या मदतीसाठी, स्वास्थ सुविधा वाढविण्यासाठी वापरण्यात येईल. यासाठी अजीम प्रेमजी फाऊंडेशनच्या 1600 कर्मचाऱ्यांची टीम काम करणार आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही 1125 कोटी रुपयांपैकी 100 कोटी विप्रो लिमिटेड, 25 कोटी विप्रो एंटरप्रायजेज आणि 1000 कोटी अझीम प्रेमजी फाऊंडेशनद्वारा देण्यात येणार आहे.

पंतप्रधान मोदींनी पीएम केअर्स फंडमध्ये दान करण्याचं आवाहन केलं आहे. यामध्ये टाटा समूहने 1500 कोटी रुपये दान करण्याची घोषणा केली आहे. शिवाय रिलाइन्स इंडस्ट्रिजने 500 कोटींची मदत जाहीर केली आहे. याशिवाय अदानी ग्रुप, वेदांता समूह, पेटीएम, जिंदल समूह आदींनी शेकडो कोटी रुपयांचे दान करणार असल्याचे जाहीर केले आहे.

संबंधित-मशिदीतील 7 इंडोनेशियनसह 37 लोक ताब्यात, पैकी 9 जणांचा निजामुद्दीन तब्लिगीत सहभाग

First Published: Apr 1, 2020 05:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading