News18 Lokmat

एका जागेसाठी 1000 शेतकऱ्यांनी भरले होते अर्ज, निवडणूक आयोगाला बदलावा लागला नियम

एका मतदारसंघात किती उमेदवारांनी उभं राहावं यासाठी काही नियम नाही. त्यामुळेच तामिळनाडूमध्ये एका ठिकाणी 1033 उमेदवारांनी अर्ज भरले होते. 1996 मधल्या विधानसभा निवडणुकीत इरोडजवळच्या मोडाकुरुची मतदारसंघात हे घडलं होतं.

News18 Lokmat | Updated On: Mar 20, 2019 08:48 PM IST

एका जागेसाठी 1000 शेतकऱ्यांनी भरले होते अर्ज, निवडणूक आयोगाला बदलावा लागला नियम

चेन्नई, 20 मार्च : एका मतदारसंघात किती उमेदवारांनी उभं राहावं यासाठी काही नियम नाही. त्यामुळेच तामिळनाडूमध्ये एका ठिकाणी 1033 उमेदवारांनी अर्ज भरले होते. 1996 मधल्या विधानसभा निवडणुकीत इरोडजवळच्या मोडाकुरुची मतदारसंघात हे घडलं होतं.

एवढे सगळे उमेदवार रिंगणात असल्यामुळे निवडणूक आयोगाला मतपत्रिकेच्याऐवजी मतपुस्तिका काढावी लागली. निवडणूक आयोगाने पूर्ण कर्तव्य बजावत आपली जबाबदारी निभावली. पण यामुळे ही निवडणूक एक महिना पुढे ढकलावी लागली आणि उमेदवारांच्या 'डिपॉझिट' ची रक्कमही वाढवण्यात आली.

या मतदारसंघात एवढे उमेदवार उभे राहिले कारण त्यांना निवडणूक आयोग आणि सरकारचं लक्ष आपल्याकडे वेधायचं होतं. पण एवढे अर्ज दाखल होऊनही निवडणूक आयोग डगमगला नाही.

'फेडरेशन ऑफ फार्मर्स असोसिएशन' या संस्थेच्या सदस्य शेतकऱ्यांनी हे रेकॉर्ड केलं होतं. शेती आणि निवडणूक सुधारणांबद्दल त्यांच्या काही मागण्या होत्या. सरकार त्याकडे लक्ष देत नव्हतं. त्यामुळेच त्यांनी एवढे उमेदवार रिंगणात उतरवले. सरकारला त्यांच्याकडे लक्ष द्यावंच लागलं.

डिपॉझिट वाढवलं

Loading...

या संस्थेने आदेश दिल्यानंतर लगेचच एक हजार शेतकऱ्यांनी नेत्यांसोबत उमेदवार अर्ज भरायला सुरुवात केली. त्यावेळी खुल्या गटासाठी 250 रुपये 'डिपॉझिट' होतं तर आरक्षित जागांसाठी 125 रुपये भरायचे होते.

तुमच्या मागण्या पूर्ण होतील, तुम्ही उमेदवार अर्ज मागे घ्या, असं या शेतकऱ्यांना काही नेत्यांनी सांगून पाहिलं पण त्यांनी ऐकलं नाही. शेवटी 1033 उमेदवारांचे अर्ज निवडणूक आयोगाला मान्य करावेच लागले. यामध्ये 1005 पुरुष होते आणि 28 महिला होत्या.

याच वर्षी नागालँडमध्येही 480 उमेदवारांनी अर्ज भरण्याचं रेकॉर्ड झालं होतं. यानंतर पुन्हा असं होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने डिपॉझिटची रक्कम वाढवली. आता लोकसभा निवडणुकीत खुल्या वर्गासाठी 25 हजार रुपये डिपॉझिट आहे तर आरक्षित जागांमध्ये 12, 500 रुपये आहे. विधानसभा निवडणुकांसाठी खुल्या जागेत डिपॉझिटची रक्कम 10 हजार रुपये तर आरक्षित जागांसाठी 5 हजार रुपये आहे.


VIDEO : भाजप आणि मोहिते कुटुंबाबद्दल, रणजितसिंह यांच्या पत्नी म्हणाल्या...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 20, 2019 06:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...