चार्जिंग सुरू असतानाच MOBILEमध्ये आला करंट, नंतर झाला स्फोट; युवकाचा मृत्यू

चार्जिंग सुरू असतानाच MOBILEमध्ये आला करंट, नंतर झाला स्फोट; युवकाचा मृत्यू

मोबाईल फोन वापरताना काही काळजी घेणं आवश्यक असतं. मात्र त्याकडे सगळ्यांचचं दुर्लक्ष होत असतं

  • Share this:

बिजनौर 10 नोव्हेंबर : मोबाईल फोनचा वापर आता प्रचंड प्रमाणात वाढला आहे. चौविस तास मोबाईल फोन सध्या जवळ बाळगला जातो. मात्र इलेक्ट्रॉनिक वस्तूंची जी काळजी घ्यायला पाहिजे ती काळजी घेतली जात नाही. त्यामुळे अनेक अपघातही घडतात. उत्तर प्रदेशमधल्या बिजनौरमध्येही असाच एक अपघात घडलाय. या अपघाताने खळबळ उडाली आहे. मोबाईल चार्जिंगला लावलेला असतानाच त्यात स्फोट झाल्याने एका युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून घटनेची चौकशी सुरू केलीय. अफजल गढ़ पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या गोपालपूर इथली ही घटना आहे. मृतक तरुणांच्या कुटुंबीयांनी जी माहिती दिली त्यानुसार त्याने फोन चार्जिंगला लावला होता.

लग्नाची तयारी सुरू असतानाच नवरदेवानं मंडपातच केली आत्महत्या

फोनचं चार्जिंग सुरू असतानाच त्यात करंट आला आणि मोबाईल फोनचा स्फोट झाला. त्यामुळे फोनजवळच असलेला युवक गंभीर जखमी झाला. त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

'आयफेल टॉवर'वर कुणी केलं होतं प्रपोज? शिल्पा शेट्टीचा धमाकेदार खुलासा

अशी घ्या काळजी

मोबाईल फोन वापरताना काही काळजी घेणं आवश्यक असतं. मात्र त्याकडे सगळ्यांचचं दुर्लक्ष होतं. पूर्ण चार्ज ते पूर्ण डिस्चार्ज असा फोन वापरला पाहिजे. गरजेपेक्षा कधीही फोन जास्त चार्ज करू नये. अनेकांना रात्री फोन चार्जिंगला लावून झोपायची सवय असते ती घातक ठरू शकते. त्याचबरोबर मोबाईल घेतानाही तो फक्त स्वस्त आहे म्हणून घेणं धोक्याचं आहे. त्याचबरोबर फोनसाठी जो चार्जर वापरला जातो तो चार्जरही चांगल्या कंपनीचा आणि ओरिजनलच घेतला पाहिजे. ड्युप्लिकेट चार्जर वापरला तर त्यामुळे अशा घटना घडू शकतात अशी भिती तज्ज्ञांनी व्यक्त केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 10, 2019 10:21 PM IST

ताज्या बातम्या