नवी दिल्ली, 20 जून : वन नेशन वन बोर्डच्या मागणी आता पुन्हा एकदा देशभरातून नागरिकांनी उचलून धरली आहे. 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांसाठी एकसारखा अभ्यासक्रम लागू करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली.
भाजपचे नेते अश्विनीकुमार उपाध्याय यांनी दाखल केलेल्या या याचिकेत म्हटले आहे की, भारतीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रमाणपत्र म्हणजेच ICSE आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे (CBSC) या दोन्ही बोर्डऐवजी एकच शिक्षण मंडळ स्थापन करावं. त्यानं अभ्यासक्रम ठरवून तो दोन्हीसाठी लागू करण्याबाबत विचार करावा असं या याचिकेत म्हटलं आहे.
हे वाचा-
PM नरेंद्र मोदींच्या हस्ते झाला गरीब कल्याण योजनेचा शुभारंभ
देशभरात केंद्र आणि राज्य सरकारांनी समान शिक्षण प्रणाली राबविण्याच्या दृष्टीने कोणतंही पाऊल उचललं नाही. कलम 21 अ अंतर्गत विनामूल्य आणि सक्तीच्या शिक्षणाबद्दल मात्र बोललं जात आहे. या अंतर्गत मुलांना जो शिक्षणाचा हक्क आहे त्यापासून ते वंचित राहात असल्याचंही म्हटलं आहे. याचिकेनुसार सामाजिक आणि आर्थिक समानता विचारात घेऊन सर्व प्राथमिक शाळांचा अभ्यासक्रमही एकसारखा करण्यात यावा. जो कॉमन सिलॅबस असेल. केंद्र आणि राज्य दोन्हीसाठी हा लागू करण्याबाबत विचार करण्यात यावा असंही या याचिकेत म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालय या याचिकेवर काय निर्देश देतं हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हे वाचा-
'जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही', हवाई दलाच्या प्रमुखांचा चीनला थेट इशारा
हे वाचा-
कूलर लावण्यासाठी हटवला व्हेंटिलेटरचा प्लग, कोरोनामुळे नाही तर असा झाला मृत्यू
संपादन- क्रांती कानेटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.