रांची 12 एप्रिल : झारखंडमधील देवघर येथे रोपवे दुर्घटनेनंतर (Jharkhand Ropeway Accident) तब्बल 44 तासांनंतर बचावकार्य पूर्ण झालेलं आहे. 44 तासांनंतर अखेर रोपवेच्या ट्रॉलीमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे. यावेळी बचावकार्य करून यातील 46 लोकांना जीव वाचवण्यात आला आहे. तर, या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना ट्रॉलीमधून पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ (Deoghar Ropeway Accident Video) समोर आला आहे.
Ropeway Accident: हात सुटला अन् हेलिकॉप्टरमधून कोसळला तरुण, थरकाप उडवणारा LIVE VIDEO
व्हिडिओमध्ये दिसतं की बचावादरम्यान हेलिकॉप्टरची दोरी केबिनमध्ये अडकल्याने एक महिला खाली पडली. याआधी काल बचावकार्य करताना एक व्यक्ती हेलिकॉप्टरजवळ पोहोचला मात्र तिथून खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओही समोर आला होता. आता या महिलेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ समोर आला आहे.
Ropeway Accident Jharkhand: आणखी एका महिलेचा रोपवेमधून पडून मृत्यू pic.twitter.com/e7QMjuNYdl
— News18Lokmat (@News18lokmat) April 12, 2022
देवघर येथील रोपवे दुर्घटनेत अडकलेल्या 46 लोकांचा जीव वाचवण्यात आला आहे. आज अखेर 44 तासांनंतर हे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झाला आहे. मात्र, यात चार लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
झोपडपट्टीतील आग पोहोचली थेट गोशाळेपर्यंत; भीषण आगीनं घेतला तब्बल 40 गायींचा जीव
रविवारी रामनवमीच्या दिवशी शेकडो पर्यटक देवघरच्या त्रिकुट डोंगरावर पूजा करण्यासाठी आणि फेरफटका मारण्यासाठी पोहोचले होते. यावेळी रोपवेची एक ट्रॉली खालील बाजूला येत होती, जी अचानक वर जाणाऱ्या ट्रॉलीला धडकली. या अपघातात ट्रॉलीमधील लोक जखमी झाले. हा अपघात झाला त्यावेळी सुमारे दोन डझन ट्रॉल्या हवेत होत्या. घाईघाईत अनेकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. घटनेत अडकलेल्या 46 लोकांचा जीव वाचवण्यात यश आलेलं आहे. मात्र चार लोकांनी यात आपला जीव गमावला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jharkhand, Shocking video viral