अयोध्येत कोरोनाचा कहर, आणखी एका पुजाऱ्याला COVID-19ची लागण झाल्याने खळबळ

Ayodhya: Tourists visit Ram Janmabhoomi Nyas Karyashala in Ayodhya, Saturday, March 14, 2020. The Ram Lalla idol in Ayodhya was shifted to a temporary new location today, thus clearing the site to begin construction of a Ram temple. (PTI Photo/Manvender Vashist)(PTI25-03-2020_000196B)

या आधी मुख्य पुजारी सतेंद्र आणि त्यांच्या सहाय्यकालाही कोरोनाची लागण झाली होती.

  • Share this:
    अयोध्या 3 ऑगस्ट: राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाला फक्त दोन दिवस राहिलेले असतांनाच अयोध्येत कोरोनाने कहर केला आहे. राम लल्लांच्या आणखी एका पुजाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्याचं उघड झालंय. या आधी मुख्य पुजारी सतेंद्र आणि त्यांच्या सहाय्यकालाही कोरोनाची लागण झाली होती. भूमिपूजनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने खास काळजी घेतली जात आहे. त्या पार्श्वभूमीवरच पुजाऱ्यांना लागण होत असल्याने साधु संतांमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 5 ऑगस्टला सकाळी अयोध्येत येणार आहे. त्यामुळे सुरक्षा संस्था जास्तच अलर्ट झाल्या आहेत. 3 ते 5 ऑगस्ट या दरम्यान दहशतवादी हल्ला करू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गुप्तचर संस्थाही सक्रीय झाल्या असून सर्व खबरदारी घेण्यात येत असल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे. या भूमिपूजन कार्यक्रमाची सुरुवात 3 ऑगस्टपासूनच होणार आहे. काशीतले विद्वान यासाठी पौरोहित्य करणार आहेत. दाक्षिणात्य राज्याचा मोदींविरोधात एल्गार; 'त्रिभाषा सूत्री आम्हाला अमान्य' असा असेल कार्यक्रम 3 ऑगस्ट – गणेश पूजा 4 ऑगस्ट – रामार्चन 5 ऑगस्ट – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन. 12.15 मिनिटांनी पंतप्रधान राम मंदिराच्या बांधकामाची पहिली वीट लावणार आहेत. 161 फुटांचे हे मंदिर असणार आहे आणि त्याला पाच घुमट असतील. गेल्या काही दशकांपासून मंदिरासाठी लागणाऱ्या खांबांचं काम कारसेवकपूरम इथं सुरु होतं. त्याचाच वापर आता केला जाणार आहे. या बांधकामात देशातल्या लोकांनाही सहभागी करून घेतलं जाणार आहे. तुमचे नातेवाईक किंवा मित्र जर विदेशात असतील तर त्यांच्यासाठी आहेत आता नवीन नियम राम मंदिराचं गर्भगृह असलेल्या जागेवर 200 फुटांखाली ‘टाइम कॅप्सुल’मध्ये  राम मंदिराचा इतिहास ठेवला जाणार असल्याचं राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे (Ram Janmbhumi Teerth Kshetra Trust) सदस्य कामेश्वर चौपाल यांनी म्हटलं होत. त्यानंतर जोरदार चर्चा सुरु झाली होती. मात्र ट्रस्टचे महासचिव आणि प्रवक्ते चंपत राय यांनी मात्र अशी कुठलीही कॅप्सुल ठेवली जाणार नसल्याचं म्हटलं आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published: