आणखी एक अ‍ॅसिड हल्ला, दीपिकाचा 'छपाक' ट्रेलर रिलीज झाल्याच्या दिवशीच घडली घटना

आणखी एक अ‍ॅसिड हल्ला, दीपिकाचा 'छपाक' ट्रेलर रिलीज झाल्याच्या दिवशीच घडली घटना

उत्तर प्रदेशातल्या भदोहीमध्ये एका 17 वर्षांच्या एका मुलीवर अ‍ॅसिड हल्ला झाला. दोन लहान मुलांच्या धार्मिक गाणी गाण्यावरून हा वाद झाला आणि त्यातच या मुलीला अ‍ॅसिड हल्ल्याला सामोरं जावं लागलं.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 डिसेंबर : महिलांवर होणाऱ्या अ‍ॅसिड हल्ल्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रेमाला नकार दिला तर किंवा एखाद्या गोष्टीचा सूड घेण्यासाठी म्हणून त्या मुलीवर अ‍ॅसिड हल्ला करून तिला कायमचं विद्रुप करणं हे विकृत मानसिकतेचं लक्षण आहे. उत्तर प्रदेशातल्या भदोहीमध्येही अशीच एक घटना घडलीय. एका 17 वर्षांच्या एका मुलीवर अ‍ॅसिड हल्ला झाला. दोन लहान मुलांच्या धार्मिक गाणी गाण्यावरून हा वाद झाला आणि त्यातच या मुलीला अ‍ॅसिड हल्ल्याला सामोरं जावं लागलं. याच घटनेत 11 जण जखमीही झालेत.

देशभरात अशा घटनांचं प्रमाण कमी झालेलं नाही. तरीही या क्रूर हल्ल्यातून पुन्हा सावरून स्वत:च्या आयुष्याला आकार देणाऱ्या रणरागिणीही काही कमी नाहीत. अशाच मालती नावाच्या शूर महिलेची व्यक्तिरेखा दीपिका पदुकोण साकारतेय. पण तिच्या या 'छपाक'सिनेमाचा टिझर रिलीज झाल्याच्या दिवशीच अ‍ॅसिड हल्ल्याची ही आणखी एक घटना घडलीय.

(हेही वाचा …आणि कार्यक्रमात ढसाढसा रडायला लागली दीपिका पदुकोण, VIDEO VIRAL)

या सिनेमामध्ये दीपिकाने अ‍ॅसिड हल्ला झालेल्या तरुणीची व्यथा आपल्यासमोर मांडली आहे. लक्ष्मी अगरवाल या अ‍ॅसिड हल्ल्यातून पुन्हा उभी राहिलेल्या या तरुणीची कहाणी वेदना, आघात यापासून ते माणसाच्या लढवय्या वृत्तीचं दर्शन घडवते, अशी या सिनेमाची टॅगलाइन आहे.

अ‍ॅसिड हल्ल्यानंतर एन्काउंटर

हैदराबादमधल्या दिशा सामूहिक बलात्कार प्रकरणात आरोपींचं एन्काउंटर करणारे पोलीस अधिकारी सज्जनार यांनी 2008 मध्ये अ‍ॅसिड हल्ला करणाऱ्या तिघांचं एन्काउंटर केलं होतं. पुन्हा असे विकृत प्रकार इथे घडू नयेत हाच यामागचा उद्देश होता, असं त्यांनी सांगितलं होतं.अ‍ॅसिड हल्ला करणाऱ्या नराधमांना कमीतकमी 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. असं असलं तरी गंभीर गुन्ह्यात ही शिक्षा जन्मठेप आणि दंडापर्यंत जाऊ शकते.

(हेही वाचा : अंगावर शहारे आणणारा 'छपाक', मन हेलावणारा दीपिका पदुकोणचा अभिनय)

=========================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 10, 2019 07:34 PM IST

ताज्या बातम्या